पालघर पूर्व पश्चिम ला जोडणारा नवली रेल्वे फाटक बंद करू नये याकरिता नगरसेविका हिंदवी पाटील व पूर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट..!

0
Spread the love

पालघर ;

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर पूर्व-पश्चिमेला जोडणारा नवली रेल्वे फाटक मा.जिल्हाधिकारी पालघर यांच्या आदेशानुसार दि.12/2/2025 रोजी पासून कायम स्वरूपी बंद करण्याचे फलक लावले होते.सदर फाटक बंद करताना प्रशासनाकडून व डी एफ सी कडून स्थानिकांना विश्वासात न घेता व कोणतीही पूर्वसूचना न देता, तसेच पर्यायी मार्गाची कोणतीही व्यवस्था न करता फाटक बंद करायचे फलक लावल्यामुळे स्थानिकांमध्ये रोश निर्माण झाला. सदर फाटक बंद केल्याने नोकरदार वर्ग,विद्यार्थी व इतर स्थानिकंना त्याचा त्रास होणार असल्याने नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सदर फाटक बंद करू नये यासाठी विभागातील नगरसेविका कुमारी हिंदवी वीरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने पूर्व भागातील सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी दि.11/02/2025 रोजी मा जिल्हाधिकाऱी पालघर यांची भेट घेऊन निवेदन दिले व जिल्हाधिकाऱ्यांना फाटक बंद न करण्याची विनंती केली.मा जिल्हाधिकारी यांनी लोकभावनेचा विचार करून, डी एफ सी चे अधिकारी श्री.देशपांडे साहेब यांना सदर रेल्वेफाटक बंद न करण्याबाबत सुचना दिल्या . तसेच पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके साहेबांनी श्री.देशपांडे यांना हे ही सांगितले की, ज्यादिवशी पुलाचे चे काम करायचे असेल फक्त त्याच दिवशी पूर्वसूचना देवून फाटक बंद करण्यात यावा.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करण्यासाठी पूर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते वीरेंद्र पाटील, मनोज घरत, अतुल गावड, विनेश घरत, संजय गायकवाड, सुशील मोरे, सद्दाम शेख, यादव साहेब, लीलाधर महाजन, नाईक, समीर पाटील, राजेश गायकवाड, छबीलदास गायकवाड, मोहम्मद खोजा, चौधरी गुरुजी, लवकुश दुबे,परशुराम बेंद्रे, किरण मोरे, महाजन साहेब, अनिल भाऊ आणि पालघर पूर्वचे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट