बिगरपरवाना गावठी पिस्टल जवळ बाळगणऱ्या इसमास जेरबंद करण्यास शिरोळ पोलीसांना यश

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

कोल्हापूर ;

शिरोळ पोलीस ठाणे

गुन्हा रजि. नंबर व कलम

५४/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम चे

कलम ३, २५ प्रमाणे

माहिती कशी प्राप्त झाली

पोलीस निरीक्षक श्री गायकवाड यांचे गोपनिय बातमीदारामार्फत

आरोपीचे नाव व पत्ता अमोल शंकर खडके, वय २८ वर्षे, रा. खडके मळा, सरकारी आय टी आय जवळ, शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

जप्त मुद्देमाल – १] ४०,०००/- त्यामध्ये गावठी पिस्टल एक, मेटल बॉडीची, त्यास बॅरल, हॅमर, ट्रिगर असलेली, पिस्टल ग्रिपवर दोन्ही बाजूस काळ्या रंगाचे फायबर असलेली व मॅगझिन नसलेली जुनी वापरती कि. स.

२] २५,०००/-त्यामध्ये हिरो होंडा कंपनीची काळया रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल एक, तिचा रजिस्ट्रेशन नंबर

MH08P0634 असा असलेली जुनी वापरती कि. स.

एकुण – ६५,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल

कारवाई करणारे अधिकारी व अमंलदार –

मा. पोलीस अधिक्षक, कोल्हापूर श्री महेंद्र पंडीत सो,

अप्पर पोलीस अधिक्षक, गडविभाग कॅम्प, इचलकरंजी, श्री. निकेश खाटमोडे सो,

उपविभागीय पोलीस अधिकारी, जयसिंगपूर विभाग, जयसिंगपूर डॉ. रोहिणी ता. सोळंके सो,

पोलीस निरीक्षक एस. एस. गायकवाड, शिरोळ पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक आय. बी. मुल्ला, पो.हे. कॉ १०११ बाबाचाँद पटेल, पो.कॉ. ४९९ रहिमान शेख, पो. कॉ. ८९९ युवराज खरात, पो. कॉ. १६२१ सुशांत ठोंबरे, पो. हे. कॉ. १६६७, दिलीप कुंभार, पो. हे. कॉ. ६११ मनोज मडीवाळ, शिरोळ पोलीस ठाणे

गुन्हाची थोडक्यात हकीकत-

दिनांक ११/०२/२०२५ रोजी रात्री पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गायकवाड यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, इसम नामे अमोल खडके, रा. शिरोळ याचेकडे विनापरवाना गावठी पिस्टल असून तो ते स्वतः जवळ बाळगतो. आज तो सदर गावठी पिस्टल एका इसमास दाखवून विक्री करण्यासाठी शिरोळ गावचे हददीत घालवाड फाटा येथे येणार आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्यानंतर सदर ठिकाणी जावून कारवाई करणेबाबत कळविले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक मुल्ला, पो. हे. कॉ. १०११ पटेल, पो. कॉ. ४९९ शेख, पो. कॉ. ८९९ खरात, पो. कॉ. १६२१ ठोंबरे, पो. हे. कॉ. ६११ मडीवाळ यांनी शिरोळ गावी घालवाड फाटा जावून छापा कारवाई केली त्यावेळी इसम नामे अमोल शंकर खडके, वय २८ वर्षे, रा. खडके मळा, सरकारी आय टी आय जवळ, शिरोळ, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर याचे कमरेला पॅन्टमध्ये खूपसलेली गावठी पिस्टल मिळून आली. सदर गावठी पिस्टल बाबत त्याचेकडे चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवू लागला. त्याचेकडे हत्यार परवाना आहे का याबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याचेकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याचेकडे मिळून आलेले गावठी पिस्टल जप्त करुन सदर इसमास ताब्यात घेण्यात आले असून त्याचेविरुध्द शिरोळ पोलीस ठाणे गु. र. नं. ५४/२०२५, भारतीय शस्त्र अधिनियम चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आजरोजी आरोपीत अटक करुन मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो, जयसिंगपूर यांचे न्यायालयात हजर केले असता त्यास दिनांक १५/०२/२०२५ रोजी अखेर पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केलेली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट