शासनाकडून निर्बंधित असलेल्या ८ ई सिगरेट जप्त, सांगलीत गुन्हा दाखल…!

पोलीस स्टेशन
सांगली शहर
गु.घ.ता.वेळ
गुन्हा रजि नंबर व कलम
६६/२०२५
प्रोव्हीबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट अॅक्ट
२०१९ चे कलम ४, ५, ७, ८




गू.दा.ता.वेळ
फिर्यादी नाव
पोशि २२४/ विनायक एकनाथ सुतार, नेम स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली
माहिती कशी प्राप्त झाली
दि. १२.०२.२०२५ रोजी १९.४० वा.
दि. १३.०२.२०२५
पोशि/विनायक सुतार
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक, संदीप घुगे,
मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर,यांचे मार्गदर्शनाखाली
पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्था.गु.अ. शाखा, सांगली, सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावंत, स्था.गु.अ. शाखा, सांगली, पोहया / इम्रान मुल्ला, अमोल ऐदाळे, संकेत मगदुम, अतुल माने, प्रतिक्षा गुरव पोना/अनंत कुडाळकर, पोकॉ/ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सोमनाथ पंतगे
अटक दिनांक
दि. १२/०२/२०२५ रोजी १९.४० वा.
आरोपीचे नाव व पत्ता
लोंढे कॉलनी, मिरज,
लखन चंद्रकांत मंगलानी, यय ३५ वर्षे, रा
जप्त मुद्देमाल
१६,०००/-रू .. किंमतीचे आठ Yuoto EXPLORER १६००० PUFFS असे ५० mg/ml Nicotine असलेले ई सिगरेट पॅकेटस् एका बाजूस निमुळते टोक असलेले व पाठीमागील बाजूस चार्जिंग व स्वीच ऑन ऑफची सुविधा असलेले ई सिगरेट किं. अं.
१६,०००/- रू
गुन्हयाची थोडक्यात हकीकतः-
मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांनी त्यांचे अधिनस्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून अंमली पदार्थ व अनुशंगाने इसमांवर कारवाई करणेसाठी स्थापन करण्यात आले आहे.
सदर पथकास पोलीस निरीक्षक, सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अंमली पदार्थ व अनुशंगाने माहिती काढून कारवाई करणेकरीता सुचना दिल्या.
त्या अनुशंगाने सांगली विभागात संशयित असलेल्या ठिकाणी पान टप-या चेक करत असताना सहा, पोलीस निरीक्षक नितीन सांवत यांचे पथकामधील पोशि/विनायक सुतार यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सांगली मारुती रोड येथील ऊँ बेल्टस् अॅण्ड नॉव्हेल्टी नावाचे दुकानातील मालक लखन मंगलानी हा बेकायदेशीररित्या ई सिगरेटची विक्री करीत आहे.
नमूद बातमीप्रमाणे पथक सांगली मारूती रोड येथील ऊँ बेल्टस् अॅण्ड नॉव्हेल्टी नावाचे दुकानात जावून दुकानामधील काऊंटर वरील इसमास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव लखन चंद्रकांत मंगलानी वय ३५ वर्षे, रा लोंढे कॉलनी, मिरज असे सांगितले. सहा. पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे दुकानाचे झडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याचे दुकानाची झडती घेतली असता काऊंटर लगत एक पांढ-या व लाल रंगाच्या बॉक्समध्ये वरील प्रमाणे एकूण ०८ ई- सिगरेट मिळून आल्या. त्याने सदरचा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल Yuoto EXPLORER कंपनीचे बेबसाईटवरून कॅश ऑन डिलेव्हरी पद्धतीने मागविली असल्याचे सांगितले. त्यास प्रोव्हीबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगरेट (प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चर, इंपोर्ट, एक्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट, सेल डिस्ट्रीब्युशन, स्टोअरेज अॅन्ड अॅडर्व्हटाइजमेंट) अॅक्ट २०१९ अन्वये ई सिगरेट विक्री करणे प्रतिबंधित असताना सुद्धा सदर ई सिगरेट मागवून त्याची साठवणूक केलेबाबत मिळून आल्याने लागलीच सहा. पोलीस निरीक्षक, नितीन सावत यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त करून सदर आरोपीवर सांगली शहर पोलीस ठाणेस वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहेत.
तसेच विशेष पथकाकडून सांगली व मिरज शहरातील संशयित पान टप-याची तपासणी करण्यात आलेली आहे. तरी यापुढे देखील विशेष पथकामार्फत सांगली जिल्हयात संशयित पान टप-या चेक करून संशयीत मुद्देमाल मिळून आल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करीत आहोत.