मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे संकल्पनेतून विद्यार्थ्यांना वाहतूक पोलीस शाखेची कार्यप्रणाली तसेच वाहतूक समस्या व आव्हाने याबाबतची माहिती उपक्रम

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे :

पुणे वाहतूक पोलीस विभाग, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स (PPCR), टॉप मॅनेजमेंट कन्सोर्टियम फाऊंडेशन (TMCF) आणि जहांगीर हॉस्पिटल यांचे सहकार्याने “Pune Traffic Mitigation Internship Program” या उपक्रम राबविण्यात आला आहे.

या वेगळ्या उपक्रमाद्वारे महाविद्यालीन नविन पिढीला शहरांमधील वाहतूक समस्या व व्यवस्थापन, तसेच शहरांचे भविष्यातील रचना, वाहतूक पोलीसांनी केलेला तांत्रिक घटकांचा (गुगल मॅप, सीसीटीव्ही, एटीएमएस इ.) समावेश, तसेच नविन माध्यमातुन केले जाणारे व्यवस्थापन त्याचप्रमाणे शहरातील प्रमुख ३२ रस्ते सुधार प्रकल्पातून केलेल्या सुधारणा या गोष्टींचा समावेश केला आहे. आज सदर उपक्रमाचे सुरूवात मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार यांचे हस्ते होत आहे. या कार्यक्रमास मा.श्री मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, डॉ. सुधीर मेहता, पिनिकल इंडस्ट्री अॅण्ड इकोमोबिलीटी, श्री मुकेश मलहोत्रा, ओनर ऑफ विकफिल्ड कंपनी, श्री अजय अगरवाल, माय पेज पुणे व श्री निशित कामत, ट्रान्सपोर्टशन सिस्टीम स्ट्रॅटेजिस्ट अॅण्ड डिझायनर पुणे ट्राफिक मिटीगेशन इनिशिएटिव्ह हे उपस्थित आहेत.

यामध्ये विद्यार्थ्यांना पुणे शहर वाहतूक शाखेमधील नियोजन, प्रशासन, सीसीटिव्ही, मल्टीमिडीया, संगणक, वाचक, ङिओ अशा विविध विभागांमार्फत होत असलेल्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आली.

तसेच ATMS (Adaptive Traffic Managment System) सिंहगड रोड येथील संस्थेला भेट देवून प्रवासाच्या वेळेच्या विश्वासार्हतेत सुधारणे करणे, रिअल टाईम ट्राफिक मॉनिटरींग अॅण्ड इंटिलिजंट ट्राफिक सिस्टमच्या आधारे अपघात टाळणे याबाबतची माहिती देण्यात आली.

पुणे शहरातील वर्दळीचे तसेच वाहतूक नियमनाकरीता आव्हानात्मक असलेल्या चौकामध्ये विद्यार्थ्यांना समक्ष नेवून वाहतूक नियमानाचे प्रात्याक्षीक दिले. तसेच फॅन्सी नंबर प्लेट, भरधाव वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सिट, विरूध्द दिशेने वाहन चालविणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच सीसीटिव्ही, ई चलान प्रणाली, टोईंग मशीन, स्पीडगन मशीन (इंटरसेप्टर वाहन) बाबत माहिती देवून याद्वारे कारवाई करण्यात येत असलेबाबतची माहिती दिली. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना वाहन चालकाच्या चुकांमुळे होणारे गंभीर परिणाम याबाबत माहिती देण्यात आली.

त्याचप्रमाणे शेवटी विद्यार्थ्यांना व वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जहांगीर हॉस्पिटल येथील वैद्यकीय तज्ञ डॉ शाम गायकवाड यांनी दैनंदिन कामकाज करत असताना अपघात ठिकाणी किंवा अचानक हॉर्ट अॅटॅक, कार्डिअॅक अरेस्ट झालेल्या व्यक्तींना प्रथमोपचार म्हणुन जीव

वाचविण्यासाठी कसा द्यावा याबाबत माहिती दिली व विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकेचे निरसन केले.

यापुढेही महाविद्यालय, सिम्बॉयोसीस स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स, सायबेज आणि इंदिरा स्कुल ऑफ बिझनेस स्टडीजच्या ७० हुन अधिक विद्यार्थी यांचा सक्रिय सहभाग होणार आहे. सदर प्रकल्प राबविण्यामध्ये पोलीस उप आयुक्त, वाहतूक श्री अमोल झेंडे, म. पोलीस निरीक्षक ऋणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक सुनील गवळी व श्रे.पो.उप.नि. रघतवान यांचा सहभाग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट