बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणा-या आरोपींस येरवडा पोलोसानी केले जेरबंद

सह संपादक- रणजित मस्के
पुणे येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके यांचे मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल निलख हे दि.०५/०२/२०२५ रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, वाडिया बंगलाजवळ, येरवडा, पुणे येथे दोन इसम अग्नीशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सुनिल सोळुंके, पोलीस अंमलदार तुषार खराडे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन दोन संशयीत इसमांना ताब्यात घेतले असता त्याच्याकडे १ पिस्टल व १ राऊंड मिळून आले. त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता १. प्रविण विकास कसबे वय २९ वर्षे रा आंबेगाव कात्रज, पुणे २. प्रतिक दादासाहेब रणवरे वय २५ वर्षे रा येवलेवाडी, पुणे असे असल्याचे सांगितले.सदरबाबत येरवडा पोलीस स्टेशन येथे गु र नं १०४/२०२५ भारतीय हत्यार कायदा ३ (२५) महाराष्ट्र पोलीस अॅक्ट कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून एकूण ३०,०००/-रु. किं. चे १ पिस्टल व १ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे. सदर गुन्हयामध्ये आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळुंके करत आहेत.सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-४, पुणे श्री. हिम्मत जाधव, मा. सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग, पुणे श्रीमती प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र शेळके, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती पल्लवी मेहेर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती स्वाती खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सपोनि सुनिल सोळुंके, सर्व्हेलन्सचे पोलीस उप-निरीक्षक महेश फटांगरे, श्रेणी पोउपनि प्रदिप सुर्वे, पोलीस अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, सागर जगदाळे, अनिल शिंदे, अमोल गायकवाड, विशाल निलख, प्रशांत कांबळे, बालाजी सोगे यांनी केलेली आहे.