पालघर पोलिसांनी पालघर मधून वाहन चोरी करणाऱ्या चोरांना केले जेरबंद…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.वाहन चोरीचे ०५ गुन्हे उघडकीस आणुन ०३ मोटार सायकल, १ पिकअप व १ छोटा हत्ती टेम्पो जप्त करण्यात पालघर पोलीस ठाणेस यश. पालघर पोलीस ठाणे हद्दीत मागील व चालु वर्षात वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते व त्याचा तपास सुरू होता. वाहन चोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग व अनंत पराड, पोलीस निरीक्षक, पालघर पोलीस ठाणे यांना वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले. त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकरी, अभिजीत धाराशिवकर, पालघर विभाग व अनंत पराड, पोलीस निरीक्षक, पालघर पोलीस ठाणे यांनी पोलीस उपनिरीक्षक, संकेत पगडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, डी. एन. आतकारी, पालघर पोलीस ठाणे यांचे पथक तयार करुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या.सदर पथकास गोपणीय माहीती मिळाली की, पालघर येथील कमलापार्क येथे राहणारा कौशल लालबहादुर कश्यप वय-२३ वर्षे, रा. प्रशांत हॉटेल जवळ कमलापार्क, ता. जि. पालघर मुळ रा. फुलपुल लाला, ता. इटवा जि. सिध्दार्थनगर हा त्याचे साथीदारांसह वाहन चोरी करत आहे. मिळालेल्या बातमीच्या व तांत्रीक तपासाच्या आधारे सदर संशयीत आरोपीचा शोध घेत असतांना तो देवीसहाय्य रोड टेलीफोन एक्सचेंजच्या समोर त्याचा साथीदार अतिकुर रहमान रहमतअली खान वय-२५ वर्षे रा. प्लॅट नं.४०१ सुरज अपार्टमेंट, शिळफाटा, दिवा ता.जि. ठाणे याचेसह मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी पालघर परीसरात ०३ मोटार सायकल, १ पिकअप, व १ छोटा हत्ती टेम्पो असे एकुण ०५ वाहने चोरी केल्याचे निष्पन्न झाले असुन त्यांना अटक करण्यात आले आहे.नमुद आरोपी यांच्याकडुन खालीलप्रमाणे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.अ.क्रपोलीस ठाणेगु. रजि. नंबर व कलम १) पालघर पोलीस ठाणेगु.रजि. नं. ३४/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम-३०३(२) प्रमाणे२) पालघर पोलीस ठाणेगु.रजि. नं. १२/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम-३०३(२) प्रमाणे३) पालघर पोलीस ठाणेगु.रजि.नं. १८/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम-३०३(२) प्रमाणे४) पालघर पोलीस ठाणेगु.रजि. नं. ३३/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम-३०३(२) प्रमाणे५) पालघर रेल्वे पोलीस ठाणेगु.रजि. नं. १४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणेसदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत पराड, पोलीस निरीक्षक, पालघर पोलीस ठाणे, पोउपनिरी, संकेत पगडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, डी. एन. आतकारी, पो. हवा/भगवान आव्हाड, पो.हवा/चंद्रकांत सुरुम, पो.अं./सागर राऊत, पो. अंम/आकाश आराक, पो. अंम / म्हाळु शिदे सर्व नेमणुक पालघर पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट