बोईसर एसबीआय बँकेचे एटीएम मशीन फोडून लाखो रुपये चोरी करणाऱ्या आरोपींना बोईसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

बोईसर: एसबीआय बँकेचे एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून तब्बल २७ लाख ११ हजारांची रोकड लांबवणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश करत बोईसर पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली असून, आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा सिटी कार, गॅस कटर व २ लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.फिर्यादी संदीप चंद्रकांत प्रभु (वय ४५), हिताची पेमेंट अँड सोल्युशन्स प्रा. लि. येथे कार्यरत आहे, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बोईसर येथील यशवंत सृष्टी अपार्टमेंटमधील एसबीआय बँकेचे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. चोरी करताना आरोपींनी सुराग न मिळावा म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर काळ्या रंगाचा स्प्रे मारला होताबोईसर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान, चोरीसाठी वापरण्यात आलेली होंडा सिटी कार बसई येथील ग्रीन नर्सरी परिसरात संशयास्पद अवस्थेत सापडली. त्यानंतर, पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी अरबाज आतिक मिसाळ (वय २७, रा. नालासोपारा) याच्या हालचालींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.तपासानंतर पोलिसांनी अरबाज आतिक मिसाळ (२७, नालासोपारा), अल्फराज आतिक मिसाळ (३६, नालासोपारा), अमन हुसेन अख्तर हुसेन मिर्झा (२३, नालासोपारा), साजिद रईस खान (२६, हरियाणा), गुज्जमील जुम्मा खान (२६, हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे. बोईसर पोलिसांनी वेळेत केलेल्या या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांत पोलिसांबद्दल विश्वास वाढला असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींना चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुन्ह्याचा सखोल तपास करताना पोलिसांनी आरोपींच्यापोलीस दलाची कौतुकास्पद कामगिरीही संपूर्ण कारवाई पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा व बोईसर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अतिशय शिताफीने ही टोळी जेरबंद केली. अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता, पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. तपासादरम्यान अजून काही आरोपींचा सहभाग उघड होण्याची शक्यता असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.हालचालींचा मागोवा घेतला आणि नेरळ (कर्जत) तसेच हरियाणा राज्यातून संशयित आरोपींना अटक केली. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी २ लाखांची रोख रक्कम, चोरीसाठी वापरण्यात आलेली होंडा सिटी कार आणि इतर महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट