मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचेकडून अटक…!

उपसंपादक : मंगेश उईके
केळवा.केळवा पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर ०२/२०२५ बी.एन.एस. कलम ३०३ (२) प्रमाणे दि. २६/०१/२०२५ रोजी दाखल असुन, सदर गुन्हयात दि. २५/०१/२०२५ सकाळी ०८.०० ते दुपारी ०४.०० वाजे चे सुमारास वाढीव गाव बैतरणा रल्वे ब्रिज चे जेटीवरुन पो. नवघर ता.जि. पालघर ३५,०००/- रुपये ची ॲक्टीव्हा स्कुटी क्र. एमएच-४८/सीव्ही-६६३८ चोरीस गेलेली आहेवरील प्रमाणे गुन्हयामधील चोरीस गेले वाहनांचा व अज्ञात आरोपीत याचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणेकरीता बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर व अभिजीत धाराशिवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी, यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे यातील आरोपीत याचा पोलीस निरीक्षक प्रदिप पाटील स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे पथकाने गुन्हयाचा समांतर तपास करीत तांत्रीक पध्दतीने तसेच गोपणीय माहितीच्या आधारे शोध घेवुन आरोपी १) विशाल रघुनाथ नाईक, वय ३६ वर्षे, रा. सांची निवास सोसायटी रुम नंबर बी/४ मोरेगांव नालासोपारा पुर्व, मुळ रा. सातपाटी, ता.जि. पालघर २) देवा लक्ष्मण थापा, वय ३५ वर्षे, रा. ईशान कॉलनी बिल्डींग रुम नंबर ३१५ मोरेगांव रॉक गार्डन समोर नालासोपारा पूर्व मुळ रा. गांव कुईका, पो. डुंगालन, जि. काठमांडु नेपाळ यांना दि. ३१/०१/२०२५ रोजी अटक करुन त्यांनी गुन्हा करतांना वापरलेली मोटार सायकल क्रमांक एमएच-४८/ डीएफ-०७४४ व गुन्हयात चोरीस गेलेली अॅक्टीवा स्कुटी क्र. एमएच-४८/सीव्ही-६६३८ असे एकूण ८०,०००/- रु. किमंतीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आलेली आहे.नमुद अटक आरोपींचे विरुध्द यापुर्वी जबरी चोरी-१, चोरी-८, शरिराविरुध्द-४, अवैद्य दारु-१, बेवारस मालमत्ता बाळगणे-२ असे एकुण खालील प्रमाणे १६ गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर व अभिजीत धाराशिवकर, उप विभागीय पोलीस अधिकारी, पालघर उप विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, पोनि/प्रदिप पाटील स्थागुशा पालघर व सपोनि/ विजया गोस्वामी, केळवा पो. ठाणे यांचे सुचनाप्रमाणे श्रेणी पोउनि/राजेश वाघ, पोहवा/संदिप सरदार, पोहवा / राकेश पाटील ने. स्थागुशा पालघर व सफौ/संजय गुरव व पोअमं/सागर सरीगर, पोअमं/जयदिप सांबरे नेम. केळवा पो. ठाणे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणुन, दोन आरोपी व दोन मोटार सायकली जप्त केलेल्या आहेत. गुन्हयाचा तपास सफौ संजय गुरव नेम. केळवा पो. ठाणे हे करीत आहेत.