जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर

दि. ०४ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा जिल्हयातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा "जिल्हा क्रीडा पुरस्कार" प्रदान करण्यात येतो.

क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणा-या क्रीडा मार्गदर्शकांकरिता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, गुणवंत क्रीडा पुरस्कार (खेळाडू), गुणवंत क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. त्यानुसार दि. २४ जानेवारी, २०२० च्या शासननुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली, दि. १४ डिसेंबर, २०२२ विहीत केली आहे. या नियमावलीनुसार पुरस्कारासाठी जिल्हयातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू / व्यक्ती यांच्याद्वारा दि.५ ते २० फेब्रुवारी, २०२५ या कालावधीत ऑफलाईन पद्धतीने अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर येथे पाठवण्यात यावेत.
अर्ज सादर करणा-या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पालघर प्रशासकीय इमारत “ब” कक्ष क्र.००१, पालघर बोईसर रोड, कोळगाव, पालघर-४०१४०४ येथे दि. ५ ते २० फेब्रुवारी , २०२५ या कालावधीत दि. २० फेब्रुवरी, २०२५ रोजी सायं. ०६:०० वाजेपर्यंत फक्त ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात यावेत. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, सुहास व्हनमाने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट