अपहृतची सुखरूप १२ तासाचे आत सुटका करून पुणे पोलीसानी ३ आरोपीना केले जेरबंद

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे

फिर्यादी यांनी नियंत्रण कक्ष पुणे येथे कॉल करून कळवीले की, त्यांचे पती यांचे काही लोकांनी अपहरण केले असून मदत पाहीजे. नमुद कॉलच्या ठिकाणी हडपसर मार्शल ही गेली असता दिलेल्या कॉलप्रमाणे प्रकार मिळून आला परंतु संशयीत हे निघून गेले होते. प्राप्त झालेल्या कॉलच्या ठिकाणी मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, डॉ. राजकुमार शिंदे, व इतर अधिकारी यांनी भेट देवुन माहिती घेतली.

फिर्यादी यांचे मुलाचे काही दिवसापूर्वी वाघोली येथील मुलीशी प्रेमसंबध होते. सदर प्रेम संबंधांना मुलीच्या कुटुंबियांचा विरोध होता. दिनांक ०३/०२/२०२५ रोजी नमुद मुलगी ही मिळून येत नसल्याने तिचे घरातील नातेवाईक हे फिर्यादी यांच्या घरी दुपारच्या सुमारास येवून त्यांच्यात वादविवाद झाले होते. व त्यानंतर ते निघून गेले होते. परत फिर्यादी हे घरी असताना मुलीचा भाऊ व इतर ३ अनोळखी इसमांनी फिर्यादी यांचे पतीला जबरदस्तीने घराचे बाहेरून ओढून त्यांनी आणलेल्या दोन दुचाकी गाडीवर जबरीने बसवून घेवून गेल्याची हकीगत सांगितली. त्याप्रमाणे हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं १६५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १४० (३),३५२,३५१ (२).३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून मा. पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-०५, पुणे, डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, यांच्या सुचनांप्रमाणे तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे व महेश कवळे यांची दोन पथके तयार केली. तपासपथक अधिकारी सपोनिरी अर्जुन कुदळे, परि पोउपनिरी. राघवेंद्र सलगर, व स्टाफ यांचे पथक वाघोली भागात रवाना झाले होते. आरोपी वाघोली, केसनंद, वाडे बोल्हाई परिसरात फिरत असल्याची माहीती बातमीदारांकडून मिळाली. परंतु आरोपी हे वारंवार त्याचा ठावठिकाणा बदलत होते. त्यानंतर सदर आरोपी हे बार्शी, सोलापूर या ठिकाणी जात असलेबाबत माहीती प्राप्त झाल्याने सपोनिरी अर्जुन कुदळे व वरिल तपास पथकाने आरोपीतांचा पाठलाग करून, पाटस टोलनाका याठिकाणी आरोपींना ताब्यात घेवून अपहृत इसमाची सुखरूप सुटका केली, अनोळखी आरोपींची नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) अभिजीत दत्तात्रय भोसले वय २२ वर्ष रा. वाघमारे वस्ती वाघोली पुणे २) रणजीत रमेश डिकोळे वय २१ वर्ष रा. लाडोबा वस्ती, वाडेबोल्हाई रोड, केसनंद पुणे. ३) मारूती अशोक गायकवाड वय २३ वर्ष रा वाडेगाय, बोलाई माता मंदिर केसनंद पुणे व त्यांचा पळून गेलेला एक साथीदार यांनी गुन्हा करताना वापर केलेल्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गुन्ह्याचा पुढील तपास महिला सपोनिरी हसीना शिकलगर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही मा.अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग, श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-५ डॉ. राजकुमार शिंदे, यांचे मागदर्शनाखाली मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्रीमती अनुराधा उदमले वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, श्री. संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), निलेश जगदाळे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, परि पोउपनिरी. राघवेंद्र सलगर, पोलीस अंमलदार संदीप राठोड, अजित मदने, कुंडलीक केसकर, प्रशात दुधाळ, निखील पवार, अमोल जाधव यांचे पथकाने प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट