पुणे पोलीसांकडून चरस या अंमली पदार्थाची विक्री करणा-या इसमास अटक.

सह संपादक- रणजित मस्के
पुणे मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, यांनी पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कर यांचे विरुध्द माहिती काढून कारवाई करणे बाबत दिलेले सुचना व आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील अधिकारी व अंलदार असे गुन्हे प्रतिबंधात्मक, तसेच अंमली पदार्थाचे गैरव्यवहाराचे अनुषंगाने पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पुणे येथील पुणे सातारा रोड, मांगडे वाडी, इंडीयन ऑईल पेट्रोलपंपा समोर सार्वजनिक रोडवर कात्रज पुणे येथे इसन नामे शिवलींग नागनाथ आवटे, वय ३९ वर्षे, रा. शंभु रेसीडेन्सी, फ्लॅट नं.३०१, मांगडेवाडी, कात्रज, पुणे हा त्याचे ताब्यात ९८ ग्रॅम २६ मिली ग्रॅम वजनाचे चरस हा अंमली पदार्थ किं.रु.९८,२६०/- चा, दोन मोबाईल फोन कि.रु. ७०,०००/- चे व रोख रक्कम ६७०/- रु व इतर ऐवज असा एकुण १,६९,६३०/- किं.रु. चा ऐवज अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. ८५/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (अ), प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.वरील नमुद कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे १ श्री गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथक. १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. उल्हास कदम, सहा. पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, प्रविण उत्तेकर, संदिप शिर्के, सचिन माळवे, विपुल गायकवाड, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, योगेश मोहीते, यांनी केली आहे.