एम.पी. एस.सी विदयार्थ्यांना परिक्षापुर्वी पेपर देतो असे कॉल करणा-या दोघांना पुणे पोलीसांनी केली अटक..

0
Spread the love

.सह संपादक- रणजित मस्के

पुणे ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची दिनांक ०२/२/२०२५ रोजी आयोजित महाराष्ट्र गट ब (अराजपत्रीत) सेवा संयुक्त पुर्व परिक्षा घेण्यात येणार आहे. या परिक्षेपुर्वी महाराष्ट्रातील नाशिक, पुणे या भागात विदयार्थ्यांना फोन करुन एम.पी.एस सी परिक्षेचे प्रश्नपत्रिका व अॅन्सर की विदयार्थ्यांना देतो त्यासाठी ४० लाख रुपये लागतील अशा प्रकारचे फोन कॉल काही नंबर वरुन करण्यात येत आहेत याबाबतची माहिती लोकसेवा आयोगाकडून प्राप्त झाली.त्याअनुषंगाने मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार यांनी तात्काळ माहिती काढुन कारवाई करणेबाबत गुन्हे शाखेस आदेश दिले. त्याप्रमाणे मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पुणे शहर व मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनानुसार व सुचनानुसार गुन्हे शाखेकडील पथकाने याबाबत तातडीने चौकशी केली.एम. पी. एस. सी परिक्षेचे पेपर विदयार्थ्यांना देते असे फोन करणारे इसम हे चाकण ता. हवेली जि. पुणे येथे असलेबाबत माहिती प्राप्त झाल्याने इसम नामे १) दिपक दयाराम गायधने, वय २६ वर्षे, रा. चाकण, जि. पुणे, मुळगाव तामसवाडी, ता. तुमसर जि. भंडारा, २) सुमित कैलास जाधव, वय २३ वर्षे, रा., चाकण, जि. पुणे, मुळगाव मु. पो. वेहेगाव ता. नांदगाव, जि. नाशिक यांना म्हाळुंगे एम.आय. डी. सी, चाकण, ता. हवेली, जि. पुणे येथुन ताब्यात घेण्यात आले. त्यांनी अशा प्रकारचे फोन कॉल केल्याचे कबुल केले. त्याबाबत अधिक चौकशी केली असता त्यांना योगेश सुरेंद्र वाघमारे रा. सोनाली ता. वराठी, जि. भंडारा याने नाशिक येथील २४ उमेदवाराची यादी दिली होती त्या यादीमधील नांदगाव जि. नाशिक येथील दोन विदर्यार्थ्यांना फोन कॉल केले असल्याचे निष्पन्न झाले. या अनुषंगाने बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगचे सचिव डॉ. सुवर्णा खरात यांचे फिर्यादी वरुन गुन्हा रजि. नं. ३९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८(४), ३५३ (१) (ब), ६२ सह महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (अनुचित मार्गास प्रतिबंध) अधिनियम २०२४ चे कलम ३ (१५), ४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे. एम.पी.एस.सी परिक्षेची प्रश्नप्रत्रिका ४० लाख रुपयेच्या बदल्यात आदल्या दिवशी उपलब्ध करुन देण्यासाठी विदयार्थ्यांना अमिष दाखविणारे फोन कॉल करुन अफवा पसरविली. तसेच विदयार्थी व पालक व सामान्य लोकांमध्ये संभ्रम व मिती पसरविली. तसेच परिक्षा प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचा व फसवणुक करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या अनुषंगाने पुढे निष्पन्न झालेला आरोपीत योगेश सुरेंद्र वाघमारे रा. सोनाली ता. वराठी, जि. भंडारा याचे शोधार्थ पुणे गुन्हे शाखेचे पथक नागापूर येथे खाना झालेले असुन सदर आरोपीस नागपूर क्राईम ब्रेच यांचे मदतीने ताब्यात घेण्यात आलेले आहे. तसेच या अनुषंगाने नागपूर पोलीसांकडून काही लोकांकडे तपास सुरु आहे.सदर गुन्हयात १) दिपक दयाराम गायधने, २) सुमित कैलास जाधव यांना अटक करण्यात आली असुन सदर गुन्हयाचा म्पास श्री. राजेंद्र मुळीक, सहा, पोलीस आयुक्त, गुन्हे २, पुणे शहर हे करीत आहेत. यातील आरोपीतांकडे नाशिक येथील २४ उमेदवाराची यादी तसेच नागपूर मधील संशयितांकडे काही यादया कशा प्राप्त झाल्या तसेच या यादीतील उमेदवार यावर्षी परिक्षेला बसलेले आहेत का याबाबत तपास सुरु आहे. अदयापर्यंतच्या तपासात एम.पी.एस.सी चा पेपर फुटल्याचे बाबत काहीही निष्पन्न झालेले नाही.सदरबाबत अधिक तपास हा मा. पोलीस आयुक्त, श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) श्री. प्रविण पाटील, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालु आहे.सदरची कामगिरी सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ व २, गुन्हे शाखेकडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, ग्रेड पोलीस उप निरीक्षक यशवंत आंबासे, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, सैदोबा भोजराव, संग्राम शिनगारे, प्रशांत शिंदे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, चेतन आपटे, अजिनाथ येडे, पवन भोसले, गणेश खरात, प्रफुल्ल चव्हाण, किशोर बर्गे, मयू भोकरे, सयाजी चव्हाण, रणजित फडतरे, राजेंद्र लाडगे महिला पोलीस अंमलदार गितांजली जाभुळकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट