सिंहगड रोड पोलीसांनी सराईत वाहन चोरी करणा-या दोन आरोपींच्या आवळल्या मुसक्या

सह संपादक- रणजित मस्के
पुणे त्यांचेकडुन ०५ मोटार सायकली व ०२ घरफोडीच्या गुन्हयातील दोन लॅपटॉप व एक कॅमेरा केला जप्तसिंहगड रोड पोलीस स्टेशन कडील तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, यांचे मार्गदर्शनाखाली वाहन चोरी करणा-या अज्ञात आरोपींचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार देवा चव्हाण, सागर शेडगे यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, दोन इसम हे चोरीची एक होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी घेवुन नवले बीज येथे येणार आहेत.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे सहा पोलीस निरी. सचिन निकम यांना कळविली असता, त्यांनी मा. वरिष्ठांना कळवुन त्यांचे आदेशाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावून खात्री करता दोन इसम हे एक होन्डा कंपनीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी घेवुन दोन इसम संशयीतरित्या नवले ब्रीज कडुन वडगाव चे दिशेने येत असताना दिसले असता, त्यांना पोलीस स्टाफचे मदतीने पकडुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्याचे नाव १) सोपान रमेश तोंडे वय २७ वर्षे रा. मुळशी जि. पुणे सध्या रा. साईनाथ वसाहत शास्त्रीनगर कोथरुड पुणे. २) आकाश सुनिल नाकाडे वय २९ वर्षे रा.मुळ वार्शी सध्या रा. नाईक आळी भैरवनाथ मंदिर जवळ, धायरी गाव पुणे. असे असल्याचे सांगितले त्याचेकडे तपास केला असता त्यांचे जवळ मिळून आलेली होंन्डा अॅक्टीव्हा मोपेड ही त्यांनी कृष्णा रेसिडेन्सी सिध्दी लॉन्स समोर, वेताळबुवा चौक नन्हेगाव पुणे येथुन चोरी केल्याचे सांगितल्याने त्याबाबत सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ५७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याने त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडे पोलीस कस्टडी दरम्यान तपास केला असता, त्याचे कडुन एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणुन एकुण ५ मोटार सायकली व ०२ घरफोडीच्या गुन्हयातील लॅपटॉप व कॅमेरा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचिन निकम सिंहगड रोड पोलीस स्टेशन पुणे शहर हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहरश्री प्रविण कुमार पाटील मा. पोलीस उप आयुक्त परीमंडळ ३, श्री. संभाजी कदम, मा. सहा पोलीस आयुक्त, सिंहगडरोड विभाग श्री. अजय परमार, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड पो.स्टे.श्री.दिलीप दाईंगडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उत्तम भजनावळे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उप निरीक्षक श्री. संतोष भांडवलकर, आबा उत्तेकर, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, उत्तम तारु, आण्णा केकाण, देवा चव्हाण, सागर शेडगे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडुळे, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, स्वप्नील मगर, विनायक मोहिते यांचे पथकाने केली.