औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत बोपोडी गावठाण येथे अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने कारवाई..

सह संपादक- रणजित मस्के
औंध ;
औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त श्री गिरीश दापकेकर यांच्या नियत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली.





कारवाई साठी स्थानिक पोलीस,मध्यवर्ती पथक,कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाकडील स्टाफ,अतिक्रमण निरीक्षक श्री.महेश मारणे ,सहायक अतिक्रमण निरीक्षक श्री राकेश काची,श्री अभिलाश कांबळे,श्री माधव बहिराम तसेच अतिक्रमण विभागाकडील ४ पोलीस ,९ MSF,०३ ट्रक,०२ पिंजरा इतकी यंत्रणा सहभागी झाली.कारवाईत ०८ काउंटर,१८ हातगाड्या जप्त करण्यात आल्या.बोपोडी गावठाण,भाऊ पाटील रस्ता येथे कारवाई करण्यात आली.
सहसा कारवाई होत नसल्याने आज ह्या भागात मोठी कारवाई झाली.स्थानिक नागरिकांमध्ये रहदारी बद्दल तक्रारी होत्या.अखेर औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.