परिमंडळ ५ मधील हडपसर पोलीस ठाणे अंतर्गत हुंडाबळीच्या गुन्ह्यातील आरोपींना ७वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा..

0
WhatsApp Image 2025-01-30 at 9.39.40 PM (1)
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

हडपसर :

थोडक्यात हकिकत :-

सदर घटना ही १५ नंबर, मनिष सुपर मार्केटमागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे येथे दिनांक ३०/११/२०१२ ते दिनांक २५/०५/२०१३ रोजीच्या दरम्यान घडली आहे. यातील आरोपी १) संतोष विठ्ठल पवार (पती), रा. १५ नंवर, मनिष सुपर मार्केटमागे, लक्ष्मी कॉलनी, हडपसर, पुणे २) विठ्ठल तुकाराम पवार (सासरे) व ३) सौ. मंगल विठ्ठल पवार (सासू) यांनी लग्नात राहिलेली भांडी, दोन तोळे सोने, कुलर, फ्रिज, पिठाची गिरणी इ. वस्तू दिले नसल्याने ते घेऊन येण्याकरीता हुंड्यासाठी मानसिक व शारिरीक छळ करुन मारहाण करीत होते.

त्यामुळे दिनांक २५/०५/२०१३ रोजी मयत सचिता संतोष पवार हिने राहते घरी सततच्या होणान्या छळाला कंटाळून अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन मयत झाल्याने हडपसर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा क्रमांक २१५/२०१३ भा.दं. वि. कलम ४९८(अ), ३०४ (वा), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपास:
सदर गुन्हयाचा तपास श्री. वी.एम. पवार, पोलीस उप निरीक्षक यांनी केला व यातील आरोपीविरुद्ध मा. न्यायालयामध्ये मुदतीत दोषारोपपत्र सादर केले. सदर केसचा सेशन कैस क्र. ९२४/२०१३ असा आहे.

शिक्षा;

वरील प्रकरणामध्ये सवळ साक्षीपुराव्याअंती मा. जिल्हा व सत्र न्यायालय, शिवाजीनगर, पुणे यांनी आरोपींना दिनांक ३०/०१/२०२५ रोजी सात बर्षे सश्रम कारावास व ८ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने साधा काराबास अशी शिक्षा सुनावली आहे.

कामगिरी

सरकारी पक्षातर्फे सहा, सरकारी वकील श्री. प्रदिप गेहलोत, कोर्ट पैरवी श्री. श्रीशैल तेलुनगी, सपोफी व श्री. अबिनाश गोसावी, पोहवा ३२४ घांनी कामकाज पाहिले. सदर कामगिरीकरीता प्रोत्साहन म्हणून डॉ. राजकुमार शिंदे (भा.पो.से), पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५, पुणे शहर यांनी कोर्ट पैरवी सपोफो श्री. श्रीशैल तेलूनगी व पोहबा ३२४ श्री. अविनाश गोसावी व नमूद गुन्हयाचे तपासी अधिकारी पोउनि बी. एम. पवार यांना १० हजार रुपये बक्षिस मंजूर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट