अनैतिक संबंधातुन आईने प्रियकरासोबत रचला मुलाच्या हत्येचा कट, पोलीसांचे तत्परतेने मुलाचा जिव वाचला, आरोपी २४ तासांचे आत जेरबंद.

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

कराड ;

दि. २९/०१/२०२५ रोजी पोलीस पाटील वराडे यांनी पोलीस ठाणेस फोन करुन सांगितले की, वराडे गावचे हददीत फॉरेस्ट ऑफीस समोर हायवेचे पुर्वेस सागवानाचे शेतात एक अनोळखी इसम गंभीर जखमी अवस्थेत पडला आहे, या माहितीवरुन, तळबीड पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले हे स्टाफसह घटनास्थळी पोहचले. त्याठिकाणी जखमीचे डोक्यात व डोळयास गंभीर जखमा झालेल्या दिसत होत्या व तो रक्ताचे थारोळयात बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता, त्यास तात्काळ तासवडे टोलनाक्याकडील अॅम्ब्युलन्स बोलावून जखमीस उपचाराकरीता पोलीस स्टाफसह तात्काळ कॉटेज हॉस्पीटल येथे पाठविले व घटनास्थळी फॉरेनसिक्स सायन्सची टीम व डॉगस्कॉड यांना पाचारण केले.

कॉटेज हॉस्पीटल येथील डॉक्टरांनी जखमीस तपासुन प्रथमोपचार करुन जखमीचे डोक्यात गंभीर दुखापत झालेने व सातारा येथे तात्काळ उपचारकामी घेवुन जाणे बाबत वैदयकीय अधिकारी यांनी सांगितले म्हणून सहा. पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी वरिष्ठ अधिकारी यांचे सोबत चर्चा केली असता मा. एस.पी.सर यांनी सांगितले की, सातारा येथे पेशंटला शिफ्ट करण्याच्या कालावधीमध्ये पेशंट दगावु शकतो त्यामुळे तुम्ही तात्काळ कृष्णा हॉस्पीटल येथे अॅडमिट करुन त्याचेवर उपचार सुरु करा असे सांगितलेने मा. डी. वाय.एस.पी. श्री अमोल ठाकुर साहेब यांनी कृष्णा हॉस्पीटल येथे संपर्क करुन जखमीवर तात्काळ उपचार करण्यास सांगितले कृष्णा हॉस्पीटल येथे काम करणारे पोलीस हवालदार राजेंद्र देशमुख यांनी तात्काळ कार्यवाही करुन जखमीवर तातडीने डॉक्टरांनी उपचार सुरु केले. पोलीसांची समय सुचकता व तत्परता यामुळे गंभीररित्या जखमी असलेल्या अनोळखी इसमाचा जीव वाचला.

घटनेच्या अनुषंगाने मा. डी.वाय.एस.पी श्री. अमोल ठाकुर साहेब यांनी वेगवेगळी पथके तयार करुन तपासाची चक्रे गतीमान केली. अनोळखी असलेल्या जखमीची पोलीसांनी सोशल मिडीयाव्दारे ओळख पटवली, असता त्याचे नाव प्रशांत महादेव शेंडगे वय २४ वर्ष रा. शिवडे ता. कराड जि. सातारा हा असल्याचे निष्पन्न झाले. घटनेबाबत अधिक माहिती प्राप्त केली असता, यातील जखमीचा भाऊ व आई हे पुणे येथे राहणेस असल्याचे समजले. घटनास्थळी मिळालेल्या भौतिक दुव्यांवरुन पोलीसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करुन रवाना केली. एकंदरीत सर्व माहिती व तांत्रिक तपासावरुन पुणे येथील३ आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केला असता, आरोपी नामे जयेंद्र गोरख जावळे वय ४० वर्षे मुळ रा. काटेपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी ता. हवेली जि. पुणे याचे व जखमीची आई शोभा महादेव शेंडगे वय ३८ वर्षे रा. काटेपुरम चौक पिंपळे गुरव सांगवी ता. हवेली जि. पुणे हिचे अनैतिक संबंध होते. शोभा हिचे माहेर शिवडे ता. कराड असुन, त्याठिकाणीच ती तिचे मुलांसह राहण्यास आहे. यातील जखमी हा व्यसनाधिन होवुन शोभा हिस त्रास देत होता. याकारणावरुन यातील आरोपी जयेंद्र जावळे व शोभा शेंडगे यांनी जयेंद्र याचे दोन साथीदार सिदधार्थ विलास वाव्हळे वय २५ वर्ष मुळ रा. मातोश्रीनगर, वांगी रोड परभणी जि. परभणी सध्या रा. राजयोग गार्डन, वाकड चौक, ता. हवेली जि. पुणे व अकबर मेहबुब शेख वय २५ वर्षे रा. निकाळजे वस्ती, सुर्यमुखी गणपती मंदीराजवळ, बाणेर गांव, बालेवाडी स्टेडीयम जवळ ता. हवेली जि. पुणे यांचेसह मुलगा जखमी प्रशांत शेंडगे यास जिवे मारण्याचा कट रचला असल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे आरोपी यांनी पुणे येथुन रिक्षाने येवुन जखमी प्रशांत यास उंब्रज येथे रिक्षात घेवुन त्यास वराडे येथील शेतात घेवुन जावुन त्यास दारु पाजुन त्याचा दगडाने ठेचुन खुन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तेथील स्थानिक नागरीक व पोलीसांचे सतर्कतेमुळे जखमीवर कृष्णा हॉस्पीटल येथे तात्काळ उपचार झाल्याने तो बचावला आहे. पोलीसांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणुन गुन्हयातील निष्पन्न आरोपींना 24 तासांचे आत अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि श्री. किरण भोसले तळबीड पो.स्टे. हे करीत आहेत.

सदर गुन्हयाचे कामगीरीबाबत मा. पोलीस अधीक्षक सातारा मा. श्री. समीर शेख सो, मा.अपर पोलीस अधीक्षक सातारा मा. श्रीमती वैशाली कडूकर मॅडम, यांनी मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्री. अमोल ठाकूर यांचे तसेच पो.नि. महेंद्र जगताप, पो.नि. अरुण देवकर, स.पो.नि. किरण भोसले, स.पो.नि. अशोक भापकर, स.पो.नि. रविंद्र भोरे, स.पो.नि. अमित बाबर, स.पो.नि. रोहीत फार्णे, पो.उ.नि. सत्यवान पाटील, विश्वास शिंगाडे, अझरुददीन शेख, दिपक वागवे, श्रेणी पो.उ.नि. दिनकर काळे, नरेंद्र मोरे, सहा. फौजदार नागेश भरते, आनंदा रजपुत, सतोष सपाटे, पोलीस हवालदार गोरखनाथ साळुंखे, आप्पा ओंबासे, प्रविण पवार, योगेश भोसले, अनिल स्वामी, म.पो.हवा विनया वाघमारे, मेघा साळुंखे, पो.ना. दिपक कोळी, संदेश दिक्षीत, पो.कॉ. निलेश विभुते, अभय मोरे, प्रविण फडतरे, गणेश राठोड, ऋषीकेश वेल्हाळ, आनंदा जाधव, दिग्वीजय सांडगे, मयुर थोरात, मयुर देशमुख, संग्राम पाटील, प्रविण गायकवाड, महीला पो.कॉ. शितल मोहीते, अश्विनी थोरवडे, सोनाली पिसाळ, कृष्णा हॉस्पीटल येथे ड्युटीस असणारे पो.हवा. राजेंद्र देशमुख यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट