मोक्का गुन्ह्यात ५ महिन्यापासून फरारी असलेल्या ३ आरोपींच्या गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने आवळल्या मुसक्या

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे :

   आज रोजी  गुन्हे  शाखा युनिट-4 चे पथक युनिट 04 हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार  जहांगीर पठाण व विशाल गाडे यांना  गोपनीय बातमी  दारामार्फत बातमी मिळाली की, खडकी पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नं. 252/2024 भारतीय न्याय संहिता कलम 189 (2), 189(4), 191 (2), 191 (3)महाराष्ट्र  संघटित गुन्हेगारी 1999 चे कायदा कलम 3(1) (ii) 3 (2) 3 (4) या दाखल गुन्ह्यात 05 महिन्यापासून  पाहिजे असलेले आरोपी नामे  1) अमन राजेंद्र डोके  वय 19 वर्षे रा. राजीव गांधी नगर खडकी पुणे 2) दीपक राजेंद्र डोके वय 23 वर्षे रा. सदर 3) किरण अनिल खुडे वय 23 रा. सदर हे इऑन आयटी पार्क समोरील गिल्ट हॉटेलमध्ये आहेत  अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने युनिटच्या 4 पथकाने  बातमीप्रमाणे खात्री करून तिघांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईकामी मा . सहा.पोलीस आयुक्त सो, खडकी विभाग पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. निखिल पिंगळे , मा. सहा. पोलीस आयुक्त गुन्हे 2 श्री राजेंद्र मुळीक, युनिट 4 कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अजय वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट 4 कडील पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदूम पोलीस अंमलदार जहांगीर पठाण, विशाल गाडे, विठ्ठल वावळ, प्रवीण भालचिम, विनोद महाजन, सुभाष आव्हाड यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट