महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास हडपसर पोलीसानी केले जेरबंद

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं ११६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम. ७४,७५ (२), ७९ वा गुन्ह्यात फिर्यादी हे दि. २४/०१/२०२५ रोजी हडपसर येथून रिक्षाने त्यांच्या घरी मांजरी येथे जात असताना सिरम कंपनी जवळ अनोळखी रिक्षा चालकाने फिर्यादी यांचा हात धरुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरूरध्द सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता.दाखल गुन्ह्याचे गांभिर्य ओळखून वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर श्री. संजय मोगले, यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे व सुचनांप्रमाणे तपास करीत असताना, गुन्ह्याचे घटनास्थळ असलेले भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासपथक अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक, अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक, महेश कवळे, पोलीस अंमलदार समीर पांडुळे, अभिजीत राऊत यांनी सीसीटीव्ही पाहीले. घटनास्थळ भागातील वेगवेगळ्या ठिकाणांवरिल सीसीटीव्ही फुटेज आधारे रिक्षा निष्पन्न करून तांत्रिक तपासाद्वारे तसेच गोपनिय माहीती आधारे आरोपी रिक्षाचालक शिवशंकर वैजनाथ परळीकर वय २१ वर्षे रा. अमिक वस्ती कर्वेनगर ब्रिजजवळ गल्ली नं. १८, कर्वे नगर पुणे यास ताब्यात घेतले. त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.सदरची कामगिरी ही मा. अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.५, पुणे श्री.डॉ. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे श्रीमती अनुराधा उदमले यांचे मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे श्री. संजय मोगले, पोनि (गुन्हे), श्री. निलेश जगदाळे, पोनि (गुन्हे), श्री. अमर काळंगे, यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप-निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार संदीप राठोड, समीर पांडुळे, अभिजीत राऊत यांचे पथकाने कामगिरी केली आहे.