भिवंडी पोलीसानी घरफोडी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना शिताफीने केली अटक

सह संपादक- रणजित मस्के
भिवंडी :गुन्हे शाखा घटक-२ चे पोलीस पथक हे परिमंडळ -०२ भिवंडी मध्ये गस्त घालीत असताना गुन्हे शाखेचे पोहवा /१३५४ शशिकांत यादव यांना बातमी मिळाली की, रेकॉर्ड वरील गुन्हेगार हे चोरी केलेल्या तांबा मालाची विक्री करण्यासाठी क्विक बाईट हॉटेलच्या समोर कल्याण कडुन भिंवडी कडे जाणाऱ्या रोडच्या कडेला एका टेम्पोसह उभे आहेत. सदर गोपनिय माहितीचे आधारे संशयीत आरोपी १) लतीफ अरिफ खान वय ३१ वर्षे, रा. मुळगांव कंम्बोगी ता. बबलेसुर, जिल्हा-विजयपुर, राज्य कर्नाटक २) संगप्पा नंदप्पा सिरमकोल वय ४४ वर्षे, रा. चोरापुर, पेंड हदकीगल्ली, जिल्हा-विजयपुर, राज्य-कर्नाटक यांना शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचेकडे केलेल्या चौकशीत त्यांनी त्यांचे साथीदार / पाहिजे असलेले आरोपी अमन खान व इतर यांचे मदतीने वेगवेगळया ठिकाणी गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. सदर आरोपीतांना विश्वासात घेवुन अधिक तपास केला असता त्यांनी नारपोली पोलीस ठाणे हद्दीत ०३ व पडघा पोलीस ठाणे हद्दीत ०२ ठिकाणी घरफोडी व चोरीचे गुन्हे केले असून सदर ठिकाणी गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे.सदर आरोपी कडुन एकुण २१,४५,०००/- रूपये किमतीचे तांब्याचे पाईप हस्तगत करण्यात करण्यात आले असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक-२, भिवंडीचे अधिकारी करीत आहेत.सदरची कामगिरी श्री. अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे ठाणे शहर, श्री. शेखर बागडे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शोध १, ठाणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, घटक- २ भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जनार्दन सोनवणे, सपोनि/श्रीराज माळी, सपोनि/धनराज केदार, पोउपनिरी / रविंद्र पाटील, सहा. पो. उप निरी. सुधाकर चौधरी, पोहवा / शशिकांत यादव, पोहवा/वामन भोईर, पोहवा/सचिन जाधव, पोहवा /सुनिल सांळुखे, पोहवा/प्रकाश पाटील, पोहवा/साबिर शेख, पोशि/उमेश ठाकुर, पोशि / अमोल इंगळे, पोशि / विजय कुंभार, पोशि / नितीन बैसाणे यांनी केलेली आहे.