जनसंवाद अभियान” अंर्तगत पालघर जिल्हा पोलीस दलाकडून विक्रमगड येथे “रस्ता सुरक्षा अभियान २०२५ जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संपन्न…!

उपसंपादक : मंगेश उईके
विक्रमगड.
मोटार वाहन अपघातास परीणामकारकरित्या आळा बसावा व नागरीकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरीता दरवर्षी संपूर्ण देशभरात “रस्ता सुरक्षा अभियान” आयोजित करण्यात येते. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार यावर्षीही दि.०१ जानेवारी २०२५ ते दि. ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत ३६ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२५ साजरा करण्याबाबत सुचित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा वाहतुक शाखा पालघर यांच्या वतीने दि.०१ जानेवारी २०२५ ते दि. ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान २०२५ संपुर्ण पालघर जिल्हयात राबविण्यात येत आहे.
पोलीस दलाचा सर्वसामान्य जनतेशी चांगला सुसंवाद व समन्वय राहावा तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सुरक्षितता आबाधित राहावी, या निमित्ताने बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांचे अनमोल संकल्पनेतुन “जनसंवाद अभियान” हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने दि.२३/०१/२०२५ रोजी विक्रमगड पोलीस ठाणे अंतर्गत भानुशाली मैदान, स्वस्तीक पेट्रोल पंपासमोर, विक्रमगड ता. विक्रमगड जि. पालघर येथे जिल्हा वाहतुक शाखा, पालघर व विक्रमगड पोलीस ठाणेचे वतीने “रस्ता सुरक्षा अभियान २०२५” जनजागृती कार्यक्रमाचे तसेच आरोग्य शिबीर, वाहन परवाना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.







“रस्ता सुरक्षा अभियान-२०२५’ निमित्ताने रस्ते अपघात, वाहतूकीचे नियम, बालविवाह, महिला अत्याचार, अंधश्रध्दा निर्मुलन, व्यसनाधिनता, सायबर क्राइम, वेठबिगारी, डायल-११२ इत्यादी विषयांवर पालघर जिल्ह्यातील यु ट्युब कलाकार व विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य व गीतांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. सदरचा कार्यक्रम संजय दराडे (भा.पो.से), विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेला आहे.
सदर कार्यक्रमास विक्रमगड तालुक्यातील अंदाजे ४००० ते ५००० पर्यंत जनसमुदाय उपस्थित होता. सदर कार्यक्रमास विक्रमगड तालुक्यातुन उपस्थित नागरीक तसेच शालेय विद्यार्थी यांनी पालघर जिल्हयातील युट्युब कलाकार व शालेय विद्यार्थ्यांनी रस्ते सुरक्षा, या विषयांवर वाहतुकीचे नियम डावलून मद्यपान करुन भरधाव वेगाने वाहन चालविल्यास कशाप्रकारे अपघात होऊन जीव जाऊ शकतो. त्यामुळे दारु पिऊन वाहन चालवु नये, विना हेल्मेट वाहन चालवु नये, विना लायसन वाहन चालवु नये या बाबतची जनजागृतीपर नाटिका, सादर करुन वाहतुक नियमांचे सर्वांनी पालन केले पाहिजे या बाबत युटयुब कलाकार व शालेय विद्यार्थ्यांमार्फत रस्ते सुरक्षा बाबत जनजागृती करण्यात आली.
सदर कार्यक्रमादरम्यान संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांनी रस्ता सुरक्षेचे नियम डावलून, मद्यपान करून भरधाव वेगाने वाहन चालविल्यास मोठा अपघात घडू शकतो. त्यात प्राण गमवण्याची गंभीर समस्या निर्माण होवू शकते. त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी वाहतुक नियमांचे पालन केल्यास रस्त्यावर वाहन चालविल्यास अपघात घडण्याची शक्यता निर्माण होत नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन केले. तसेच त्यांचे हस्ते मोफत हेल्मेटचे वाटप करण्यात करण्यात येवून नेहमी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले.
सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात. काही नागरीक सायबर गुन्हेगारांच्या जाळयात अडकत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हयाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणुक हा एक प्रकारचा आर्थीक दहशदवाद आहे. पालघर जिल्हयातील नागरीक सायबर गुन्हंयाना बळी पडु नये तसेच त्यांचेमध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे संकल्पनेतुन जनसंवाद अभियानांतर्गत पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने “सायबर गुन्हे मुक्त गाव” ही मोहिम राबविण्यात येत असून त्याची चित्रफीत दाखवून सायबर क्राईम विषयी जनजागृती करण्यात आली.
सदर कार्यक्रम हा संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, गणपतराव पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह) पालघर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/प्रदिप गित्ते, पोलीस कल्याण शाखा, पालघर, सपोनि/सुरेश साळुंखे, प्रभारी अधिकारी, जिल्हा वाहतुक शाखा, पालघर, सपोनि /रविंद्र पारखे, प्रभारी अधिकारी, विक्रमगड पोलीस ठाणे, पोउपनि/संदिप नागरे, वाहतुक शाखा पालघर, सफी/अंकुश कुवरा, पोहवा/हरवटे व जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडला.