कानात इअरफोन लावून रेल्वे फाटक ओलांडताना ट्रेनच्या धडकेने विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू…!

उपसंपादक : मंगेश उईके
सफाळे.
दि. 23 जानेवारी 2025 रोजी सफाळे स्टेशन येथे ट्रेनने धडक दिल्याने विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी कानात इअरफोन लावून रेल्वे फाटक ओलांडत होती. अशा स्थितीत तीला ट्रेनचा आवाज ऐकू येत नव्हता, त्यामुळे हा अपघात झाला. माकणे गावातील वैष्णवी रावल या विद्यार्थिनीचा पश्चिम रेल्वे अंतर्गत पालघरच्या सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रुळ ओलांडताना राजधानी एक्स्प्रेसने धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.