पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे “नेताजी सुभाषचंद्र बोस” व “बाळासाहेब ठाकरे” यांची जयंती साजरी..

सह संपादक- रणजित मस्के


गोंदिया ; महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग GAD-49022 /65/ 2024 – GAD (DESK-29) दिनांक- 27/12/2024 शासन निर्णय तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांचे पत्र क्र पोमसं/36/र.व.का./(8300) शा.नि. अधिसुचना/01/2023 मुंबई दिनांक- 30/12/2024 अन्वये सन- 2025 मध्ये सर्व शासकिय कार्यालयात राष्ट्र पुरुष थोर व्यक्ती संत व समाज सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी.. असे निर्देश आहेत त्याअनुषंगाने मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे शुभ हस्ते आज दिनांक- 23 जानेवारी 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे *”नेताजी सुभाषचंद्र बोस”* व *”बाळासाहेब ठाकरे”* यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.सदर कार्यक्रमात मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया, यांच्यासह, प्रभारी पोलीस उप- अधिक्षक (गृह), श्री. रामेश्वर पिपरेवार, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार, मंत्रालयीन स्टॉफ मोठ्या संख्येने उपस्थित होते.