मालवाहतुक करणा-या नामांकित कंपनीच्या नोकराने केली कंपनीची ५५ लाखाची सायबर फसवणुक…

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे ; सायबर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.०५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ०५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२),३१८(४),६१ (२), ३१६ (२), ३ (५) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६सी, ६६ डी या गुन्ह्याचे तपासकामी सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांचे कडील गुन्ह्यातील आरोपी शोध घेण कामी पो.उप.निरी संदिप कदम, पो. अमंलदार नवनाथ कोंडे, संदिप पवार, दिनेश मरकड यांनी वेशांतर करुन सोलापुर परिसरामध्ये शोध घेवुन कंपनीला गंडा घालणारे एकुण ४ आरोपी अटक करुन गुन्हा उघड केला आहे.माल वाहतुक करणा-या नामांकित कंपनीला दि.२१/१२/२०२४ रोजी रात्रौ ०२/२० वा.ते दि.०२/०१/२०२५ रोजीचे दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने कंपनीची फसवणुक करण्याच्या उद्देशाने अप्रमाणिकपणे, कट करुन कंपनीचे व्हेन्डरच्या कामाच्या पेमेंट संदर्भात असलेल्या गुगल शिटच्या लिंक मध्ये कंपनीच्या दिल्ली येथिल खन्या व्हॅन्डरच्या बँक खात्याची माहिती बदलुन अज्ञात इसमाने स्वतःचे बैंक खाते क्रमांकाची माहिती टाकुन गुगल शिट कंपनीला ऑनलाईन दाखल केली. दाखल केलेली माहिती हि खऱ्या व्हेन्डरने पाठवलेली आहे असे कंपनीच्या फायनान्स विभागास भासवुन सदर फायन्सास विभागास अज्ञात व्यक्तीचे बँक खाते कंपनीच्या सिस्टी मध्ये जोडण्यास भाग पाडले व ख-या व्हेन्डरला मालवाहतुकी बाबत ट्रान्सफर करावयचे पेमेंट ५५,५४,९९९/-रु. हे अज्ञाताच्या बैंक खात्या मध्ये ट्रान्सफर करण्यास लावुन कंपनीची ५५,५४,९९९/- रु. ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली म्हणुन, सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दि.०६/०१/२०२५ रोजी कंपनीच्या फायनान्स विभागच्या मॅनेजरने तक्रार दाखल केली आहे.सदर गुन्ह्यात कंपनीचे गुगल शिट लिंक बाबत तांत्रिक विश्लेषण करुन तसेच अज्ञात बैंक खात्या बाबतची माहिती घेवुन गुन्ह्यातील आरोपी सोलापुर येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पो. उप निरी. संदिप कदम, पो. अमंलदार नवनाथ कोंडे, संदिप पवार, दिनेश मरकड असे खाजगी वाहनाने सोलापुर येथे खाना झाले. आरोपी आकाश करिअप्पा गायकवाड रा.ए. जे.पाटीलनगर, सोलापुर व शिवानंद बसवराज तळवडे रा. विजापुर रोड सोरेगाव, सोलापुर हे सातरस्ता चौक, सोलापुर आणि सोरेगाव, सोलापुर येथे असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने तात्काळ क्षणाचा विलंब न करता त्यांचा वेशांतर करुन शोध घेवुन त्यांना ताब्यात घेतले त्यांचेकडे अधिक चौकशी केली असतात्यांनी मालवाहतुक करणा-या नामांकित कंपनीतीलच कारकुन आरोपी उमेर हमीद शेख रा. लक्ष्मीनगर भारत बेकरी जवळ, नुराणी मशिद, येरवडा, पुणे याने त्याचा मित्र आरोपी सोन्या उर्फ आकाश राजु परीट, रा. महाराष्ट्र हौ. बोर्ड, नागपुरचाळ येरवडा पुणे. याचे मदतीने कंपनीच्या गुगलशिट मध्ये फेरफार करुन कंपनीत ५५.५४,९९९/-रुपये रक्कम फसवणुक करुन काढून घेण्याचा प्लॅन केलेला असुन कंपनीच्या फसवणुक केलेले पैसे हे फरार आरोपी याच्या बँक खात्यावर घेवुन ती सर्व रक्कम आम्ही सर्वानी वाटुन घेतली आहे असे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार सायबर पोलीस ठाण्याचे तपास पथक सोलापुर वरुन पुण्यामध्ये येवुन त्यांनी कंपनीचा कारकुन उमेर शेख व त्याचा मित्र आकाश ऊर्फ सोन्या परिट यास येरवडा, पुणे या ठिकाणी वेंशांतर करुन शिताफिने पकडून त्यांना अटक करुन सायबर गुन्हा उघडकीस आणला आहे.सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप-आयुक्त आर्थिक व सायबर पुणे शहर श्री. विवेक मासाळ, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक व सायबर पुणे श्री. मच्छिंद्र खाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन पुणे शहर, श्रीमती स्वप्नाली शिंदे, पोलीस उप-निरीक्षक संदिप कदम, पोलीस अमंलदार कोंडे, संदिप पवार, दिनेश मरकड, मुंढे, यादव, नागटिळक यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट