कोल्हापुर पोलीसानी गोवा येथे १० किलो गांजा विक्री करण्यासाठी जात असलेल्या तरुणास ठोकल्या बेडया…

सह संपादक- रणजित मस्के
कोल्हापुर ; स्थानिक गुन्हे शाखा यांनी त्याच्या सातारा येथील साथीदाराकडून 81 किलो गांजा असा एकूण 91 किलो गांजा व इतर साहित्य मिळुन 23,90,000/-रु. किंमतीचा मुददेमाल जप्त. मा. पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडित साो, यांनी अवैद्य व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.मा.पोलीस अधीक्षक साो, यांनी दिले आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर कडील सहा. पोलीस निरीक्षक श्री. चेतन मसुटगे व पोलीस उप निरीक्षक श्री. जालींदर जाधव यांची दोन पथके तयार करून अवैद्य व्यवसाय तसेच अंमली पदार्थाचे अनुषंगने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, पोलीस अभिलेखावरील फैयाज मोकाशी रा. मलकापूर, ता. कराड, जि. सातारा हा उचगांव, ता. करवीर मार्गे गोवा येथे गांजा विक्री करण्यासाठी ग्रे रंगाचे डिओ मोपेड गाडी नंबर एम. एच.50-एस. 4593 यावरुन जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.मिळाले बातमीचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांनी दोन्ही पथकासह हायवे रोडवर उचगांव ब्रिजजवळ जाऊन सापळा लावून 01) फैयाज अली मोकाशी, वय 37 वर्षे, रा. शिवाजी चौक, मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा यास सुमारे 10 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ व डिओ मोपेड गाडीसह पकडले. त्यास दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून त्याचे कब्जातून बेकायदेशिर विक्रीकरिता आणलेला गांजा ह्या अंमली पदार्थासह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याचे कब्जात मिळालेले गांजा हा कोठुन आणला व कोठे घेवून जाणार आहे याबाबत विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली म्हणून त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे विचारपूस केली असता त्याचे कब्जात मिळालेले गांजा हा अंमली पदार्थ त्याने त्याचे ओळखीचा सोहेल मोमीन, रा. उंब्रज, जिल्हा सातारा याचेकडुन आणला असून सॅम पुर्ण नांव माहिती नाही रा. पणजी गोवा यास विकणेकरीता जात असलेचे सांगीतले. फैयाज मोकाशी यास त्याचे कब्जात मिळालेले मुद्देमालासह ताब्यात घेवून उचगांव ब्रिज येथून उंब्रज, जि. सातारा येथे जावून 02) सोहेल सलीम मोमीन, वय 33 वर्षे, रा. मोमीन मोहल्ला, उंब्रज, जिल्हा सातारा यास ताब्यात घेतले. त्यानंतर फैयाज मोकाशी यास पुढे विक्री करणेकरीता दिलेला गांजा कोठून आणला याबाबत सोहेल मोमीन यास विश्वासात घेवून त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने समीर शेख, रा. रहीमतपूर, ता. कोरेगाव याचेकडुन आणला असलेचे सांगीतले. त्यानंतर समीर शेख याचेबाबत अधिक विचारपूस करुन सोहेल सलीम मोमीन याचे मदतीने 03) समीर उर्फ तौसिफ रमजान शेख, वय 21 वर्षे, रा. रहीमतपूर, ता. कोरेगाव, जिल्हा सातारा यास त्याचे राहते घरातून ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपूसकेली असता त्याने गुन्हा केलेची कबुली दिली. तसेच गांजाबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने गांजाचा साठा त्याचे राहते घरामध्ये केलेचे सांगीतले. त्याचे राहते घरातून सुमारे 81 किलो गांजा हा अंमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेतला आहे.आरोपी फैयाज अली मोकाशी, वय 37 वर्षे, रा. शिवाजी चौक, मलकापूर, ता. कराड, जिल्हा सातारा याचे विरुध्द यापुर्वी दोन गुन्हे दाखल असलेचे अभिलेखावरुन दिसुन येत आहे.आरोपी नामे 01) फैयाज अली मोकाशी यास गांजा हा अंमली पदार्थ विक्री करणेकरीता जात असताना त्यास उचगांव, ता. करवीर येथे हायवे रोडवरील ब्रीजजवळ पकडून त्याचे कब्जातून प्रथम 10 किलो गांजा पकडून त्याचेकडे अधिक तपास करुन त्यास विक्री करणेकरीता गांजा दिलेला 02) सोहेल सलीम मोमीन यास पकडुन त्याचे माहितीने 03) समीर उर्फ तौसिफ रमजान शेख यास पकडुन त्याचे राहते घरातून आणखीन 81 किलो गांजा हा अंमली पदार्थ मिळुन आला आहे. तिन्ही आरोपीकडुन एकूण 91 किलो गांजा, डिओ मोपेड गाडी एक व तीन मोबाईल हँन्डसेट असा एकूण 23,90,000/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नमुद इसमांचे विरुध्द गांधीनगर पोलीस ठाणेस एन.डी.पी. एस. कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येत आहे. नमुद आरोपीकडे मिळालेला गांजा हा त्यांनी कोठून आणला आहे व ते कोठे घेवून जाणार आहेत याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पुढील तपास करीत आहेत.सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंडित साो, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक श्री जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रविण पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, संतोष बरगे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, अशोक पोवार, परशुराम गुजरे, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, शिवानंद मठपती, नामदेव यादव, अनिल जाधव, यशवंत कुंभार व हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे.