अनोळखी इसमांकडुन फायरींग झाल्याचा बनाव करणा-या सराईत आरोपी अनिल चव्हाणचा कोंढवा पोलीसांनी केला पर्दाफाश..

0
Spread the love

संपादक- रणजित मस्के

पुणे :दि.१९/०१/२०२५ रोजी कोंढवा पोलीस ठाणे येथे माहीती मिळाली की, स्वामीनारायण मंदिर परिसरात प्रदिप सावंत नावाच्या गुंडावर गोळीबार झाला असून त्यामध्ये त्याच्या उजव्या हाताचे दंडावर गोळी लागली आहे. त्याचेवर सिल्व्हर बिर्च रुग्णालय नन्हे या ठिकाणी उपचार चालू आहे.उपचार करणा-या गुंडाकडे पोलीसांनी प्रथमिक चौकशी केली असता त्याने प्रथम पोलीसांची दिशाभुल केली. पोलीसांनी त्याची उलट तपासणी केली असता त्याने सांगितले की, तो व त्याचा पोलीस रेकॉर्डवरील मित्र अनिल चव्हाण असे साळवे गार्डन परिसरातील नर्सरी येथे अनिल याने आणलेले देशी बनावटीचे पिस्तूल हाताळत असताना अनिल चव्हाण याच्या हातून ती खांद्याला लागून जखमी झाल्याचे समजले म्हणुन कोंढवा पोलीस स्टेशन गु. रजि. नं.४८/२०२५ भा.न्या.सं.क.१२५ (ब) भा. हत्यार का. क. ३ (२५), २७ सह महा, पो अधि. क. ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमुद गुन्ह्यातील आरोपी अनिल रमेश चव्हाण, वय २४ वर्षे, रा. आंबिकानगर, जगताप डेअरी जवळ, अप्पर कोंढवा रोड, पुणे हा पळुन गेला असल्याने त्याचा शोध घेणेबाबत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विनय पाटणकर, पो.निरी. गुन्हे श्री. अब्दुल रौफ शेख व पो.निरी, गुन्हे श्री. सुरज बेंद्रे यांनी तपास पथकातील पो. उप निरी, बालाजी डिगोळे व पो. अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार सुरज शुक्ला यांना मिळालेल्या बातमीवरून आरोपींचा शोध घेत असताना सदर आरोपीस अप्पर बिबवेवाडी परिसरातून दोन तासांत ताब्यात घेवुन त्यास अटक करण्यात आली आहे. तसेच त्याचे ताब्यातून नमुद गुन्ह्यात वापरलेले गावठी बनावटीचे पिस्तुल हस्तगत करण्यात आले..नमुद कारवाई ही मा.अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५. डॉ. श्री. राजकुमार शिंदे, मा. सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग, श्री. धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पो. निरीक्षक, श्री. विनय पाटणकर, पो.निरी. (गुन्हे) श्री.अब्दुल रौफ शेख, पो. निरी. (गुन्हे) श्री. सुरज बेंद्रे, तपास पथकाचे पोलीस उप निरी, बालाजी डिगोळे, पो. अमंलदार सतिश चव्हाण, विशाल मेमाणे, लवेश शिंदे, अमोल हिरवे, सुरज शुक्ला, संतोष बनसुडे, लक्ष्मण होळकर, शाहिद शेख, सागर भोसले, सुजित मदन यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट