मोक्का गुन्ह्यातील दोन वर्षापासुन फरार असलेले दोन आरोपी खडकी पोलीस स्टेशन कडुन जेरबंदसह

0
Spread the love

संपादक- रणजित मस्के

पुणे

खडकी पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ४२६/२०२३ भादवि कलम ३०७,३२३,५०४,५०६,१४३, १४४,१४७, १४८,१४९ महा.पो.का.क.३७ (१) सह १३५, शस्त्र अधिनियम कलम ४ (२५), क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ७, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९ चे कलम ३(१) (ii) ३ (२), ३ (४) प्रमाणे दिनांक १३/११/२०२३ रोजी दाखल असून सदर गुन्ह्यात आरोपी नामे, १) अतिक धर्मेंद्र गरुड वय ३५ वर्षे, रा.एस.आर.ए. बिल्डींग, वारजे, पुणे, २) अनुज अविनाश वाघमारे, वय २३ वर्षे, रा. आंबेडकर चौक, औंध रोड, पुणे हे सदर गुन्हा घडले नंतर पसार झाले होते. सदरचा गुन्हा दाखल झालेपासुन आपले अस्तित्व लपवुन वावरत होते. सदर आरोपीबाबत तांत्रिक तपास करुन बातमी प्राप्त केली असता, यातील आरोपी नामे, १) अतिक धर्मेंद्र गरुड, हा भेगडे वस्ती, तळेगाव दाभाडे, पुणे येथे तसेच २) अनुज अविनाश वाघमारे, हा उरळीकांचन, पुणे येथे राहणेस असलेबाबत खात्रीशीर बातमी प्राप्त झालेने सदरबाबत मा. वरिष्ठांची परवानगी घेवुन सदर ठिकाणी खडकी पोलीस स्टेशन कडील तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक, आण्णा गुंजाळ, पो. हवा. संदेश निकाळजे, पो. अंमलदार अतुल इंगळे, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, प्रताप केदारी असे सदर ठिकाणी जावुन दोन्ही आरोपीना शिताफीने ताब्यात घेतले. सदर आरोपीना पुढील कार्यवाही कामी मा. सहा पोलीस आयुक्त, खडकी विभाग, श्री. विठ्ठल दबडे यांचेकडे सुपुर्द केले आहे. सदर गुन्ह्याचा तपास मा. सहा पोलीस आयुक्त, खड़की विभाग, श्री. विठ्ठल दबडे, हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. मनोज पाटील, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४. श्री. हिंमत जाधव, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर श्री विठ्ठल दबडे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. गजानन चोरमले, तपास पथक प्रमुख पोलीस उप निरीक्षक आण्णा गुंजाळ, पो. अमंलदार संदेश निकाळजे, अतुल इंगळे, ऋषिकेश दिघे, अनिकेत भोसले, प्रताप केदारी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट