मायभुमी फाउंडेशन मार्फत सन २०२५ च्या दिनदर्शिकेचे मोठ्या उत्साहात प्रकाशन..

संपादिका- दिप्ती भोगल
मुंबई ;
मायभूमी फाऊंडेशन मार्फत आज दि.17/01/2025 रोजी संध्याकाळी 7:00 वाजता वेल्फेअर सेंटर, जी टी हॉस्पिटल एस टी कॉलेज कंपाऊंड बी टी रोड मुंबई 400001, येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता.











सदर सोहळ्यास अध्यक्ष स्थान मायभूमी फाऊंडेशनचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अनंत धोंडू काप यांनी भूषविले सदर सोहळ्यास माजी नगरसेवक श्री गणेश सानप साहेब(कुलाबा) यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मा.श्री राकेश तुपट (संपर्क प्रमुख, माणगाव), मा.श्री चेतन मोरे (सह संपर्क प्रमुख माणगाव व मायभूमी फाऊंडेशन सल्लागार,मायभूमी फाऊंडेशन), मा.श्री विनोद साडविलकर (रूग्णामित्र संस्थापक), मा.श्री शंकर बांद्रे (संपर्क प्रमुख मंडणगड) मा.श्री तुकाराम गायकवाड (मंडणगड तालुका संघटक), मा.श्री विश्वास शिंदे (शिवसेना सचिव मंडणगड) , मा.श्री अनंत फिलसे (उद्योजक) मा.श्री संतोष चौगुले (संचालक कुणबी बँक मुंबई) श्री महादेव रा.धामणे (मायभूमी फाऊंडेशन कार्याध्यक्ष), मा.श्री रघुनाथ पोस्तूरे, (मायभूमी उपाध्यक्ष व जे जे हॉस्पिटल रुग्णसेवक) ,श्री सत्यजित भोनकर (मायभूमी सहसचिव, टाटा हॉस्पीटल), श्री कृष्णा चाचले (मायभूमी खजिनदार), श्री विजय भोस्तेकर (मा. सचिव कुणबी समाजोन्नती संघ), श्री प्रफुल नवार सर (अध्यक्ष साहस चॅरिटेबल व वैद्यकीय समाजसेवक), सौ. प्रियांका तांबट (सायन हॉस्पीटल), श्री राजेश पवार (जे जे हॉस्पिटल), श्री महेश चव्हाण (जे जे हॉस्पिटल) श्री जाणू डोंगरे (मा.उपाध्यक्ष कुणबी समाज, माणगाव), श्री विजय दुर्गवले (उपशाखा प्रमुख गिरगाव) श्री प्रकाश चाचले (अध्यक्ष आसवले ग्रामस्थ मंडळ) श्री शांताराम शिगवण, (साचिव आसवले ग्रामस्थ मंडळ) श्री दिपक पवार, आत्माराम शिगवण (सल्लागार)श्री किशोर मालुसरे (जी टी हॉस्पिटल), चंद्रकांत नेमाडे (जी टी हॉस्पिटल), श्री उदय मोरे (सचिव जी टी हॉस्पिटल गणेशोस्तव मंडळ), श्री मुकेश वाघेला (अध्यक्ष नवरात्र उत्सव मंडळ जी टी हॉस्पीटल), श्री हरीश पवार (मुंबई हॉस्पीटल) श्री योगेश म्हाहामुणकर (उपशाखा प्रमुख), श्री रमेश म्हाहामुणकर (जी टी हॉस्पिटल) श्री देवेंद्र गोठल, , श्री संतोष उंडरे, मोहन म्हस्के(संपर्क प्रमुख मायभूमी) रत्नेश बाईत, अनिकेत काप, रितेश बाईत, सुरेश काप, नरेश बोर्ले, सुभाष हरावडे प्रभाकर शिगवण, सचिन बोर्ले, सचिन जोशी, अमृत पदरत, श्री राजु पालकर माणगाव (उपाध्यक्ष कुणबी समाज), श्री भिकू मालप (युवा क्रीडा कमिटी सल्लागार) आधी मान्यवर उपस्थीत होते.
सर्व मान्यवरांचा मायभूमी फाऊंडेशन मार्फत सन्मान करण्यात आला व सूत्रसंचालन व प्रस्तावना श्री कृष्णा चाचले व श्री सत्यजित भोंनकर यांनी केले अनेक मान्यवरांनी आरोग्यविषयक समस्याबाबत माहिती दिली व शासनाच्या विविध योजना याची माहिती दिली आणि विचार व्यक्त केले मायभूमी फाऊंडेशन मार्फत अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे सांगण्यात आले व आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजित करून गोर गरीब गरजू रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले व अल्प दरात अँब्युलन्स सेवा अशा अनेक सेवेसाठी मायभूमी फाऊंडेशन प्रयत्नशिल आहे.
मायभूमीचे प्रमूख सल्लागार कै. प्रदीप मोगरे साहेब के ई एम हॉस्पीटल मध्ये सेवा देनारे यांना श्रांधाजली वाहून कार्यक्रमाची सांगता कऱण्यात आली.