कोल्हापुरातून एका १४ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करून फरार असलेला आरोपी अल्ताफ पोलीसांच्या रडारवर…

0
Spread the love

प्रतिनिधी-रणजित मस्के

कोल्हापुर : आरोपी शोधपत्रिका नुसार गुरंन. ५६५/२०२२ भादंवि कलम ३६३,३५४ (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन
संरक्षण अधिनियम-२०१२ कलम १२ आरोपी याचेवाबतची शोधपत्रिका.

जुना राजवाडा पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५६५/२०२२ भादंवि कलम ३६३, ३५४ (ड) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण अधिनियम-२०१२ कलम १२ प्रमाणे दाखल गुन्हयातील फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी वय १४ वर्षे ०३ महिने हिस दिनांक १७.१०.२०२२ रोजी सकाळी १०.३० वा. चे सुमारास प्रायव्हेट हायस्कुल, खासबाग मैदान, कोल्हापूर येथुन यातील आरोपी नामे अल्ताफ मिनाज अहमद काझी वय २२ वर्षे, रा. प्लॉट नं. ४५२, आर. के. नगर सोसायटी नं.६, पाचगाव, ता. करवीर जि, कोल्हापूर याने त्याचे कडील स्प्लेंडर मोटारसायकल वरुन अपहरण करुन घेऊन गेल्याने गुन्हा दाखल आहे.

यातील आरोपी अल्ताफ मिनाजअहमद काझी वय २२ वर्षे, रा. प्लॉट नं. ४५२, आर. के. नगर सोसायटी नं. ६. पाचगाव, ता. करवीर जि. कोल्हापूर हा गुन्हा घडल्यापासुन त्यांचे राहते घरातुन व परिसरातुन निघुन गेलेला असुन तो आपले अस्तित्व लपवुन राहत आहेत. त्याचे फोटो खालीलप्रमाणे आहेत.

अपहत मुलीचे वर्णन

वय :१४ वर्ष ३ महिने
रंग : गोरा
उंची : ५ फुट ४ इच
चेहरा : उभट
वर्णन:भुवयाजवळ जुन्या जखमेचे व्रण
परिधान केलेले कपड़े :लाल रंगाचा टि शर्ट, राखाडी रंगाची पॅन्ट सोबत
बॅग व काळे रंगाचे जॅकेट व पांढरे रंगाचा शर्ट.

अल्ताफ मिनाजअहमद काझी वय २२ वर्षे, रा. प्लॉट नं. ४५२, आर. के. नगर सोसायटी नं.६. पाचगाव, ता. करवीर जि, कोल्हापूर नमुद आरोपी अथवा अपहत मुलगी यांची माहिती मिळाल्यास किंवा असा इसम आपले पोलीस स्टेशन हद्दीत दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष, कोल्हापूर – ०२३१-२६६२३३३. जुना राजवाडा पोलीस ठाणे कोल्हापूर फोन क्रमांक ०२३१-२५४२२३३ किंवा तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदिप जाधव मो. नं. ८३६९४१९३०७. या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट