मोटारसायकल चोरी करणारे २ सराईत गुन्हेगार मानपाडा डोंबिवली पोलीसांकडुन उल्हासनगर येथुन अटक ४ गुन्हे उघड …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मानपाडा ;

मानपाडा पोलीस ठाणे हददीत मोटारसायकल बोरीचे गुन्हे पडत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यसाठी मा. श्री. संजय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री. अतुल झेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. कल्याण व मा. श्री. सुहास हेमाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांनी विशेष मोहिम राबविण्याबाबत मार्गदर्शन करुन सुचना दिलेल्या होत्या.

त्याप्रमाणे मानपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.निरी. श्री. विजय कादबाने यांनी मानपाडा ठाणेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करून त्यांना वरिष्ठांनी दिलेल्या आदेश व सुचनांप्रमाणे मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे सदरचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटिव्ही फुटेज, तांत्रिक तपास करीत असतांना आरोपीतांबाबत सपोनि श्री संपत फडोळ यांना बातमीदाराकडुन खात्रीशिर बातमी प्राप्त झाली. मिळालेल्या गोपनिय बातमीदाराच्या आधारे सपोनि संपत फडोळ व गुन्हे प्रकटीकरण पथक असे उल्हासनगर येथे रवाना होवून अहोरात्र मेहनत घेवून सराईत आरोपीत नामे १) रितिक शरद बाविस्कर वय १९ वर्षे धंदा मजुरी रा. दुपती निवास, गणेश नगर, आटिआय ग्राउंडच्या जवळ, ओटी सेक्शन, उल्हासनगर ४, २) कुणाल कृष्णा नायडु वय १९ वर्षे धंदा मजुरी रा. आलवट पार्किंगच्या बाजुला, टायगर सोसायटीच्या बाजुला, उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या जवळ, उल्हासनगर ४ यांना उल्हासनगर येथुन ताब्यात पेवून त्यांना मानपाडा पो.स्टे.गु.र.नं. ११०/२०२४, भादवि कलम ३७९, ३४ या गुन्हयात अटक करून त्यांच्याकडुन मानपाडा पोलीस ठाणे व तसेच कोळसेवाडी पोलीस ठाणे व एनआरआय पोलीस ठाणे, नवी मुंबई येथील एकुण ०४ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत.

सदर अटक आरोपींकडुन चोरी झालेल्या चार मोटारसायकल असा एकुण रक्कम २,७०,०००/- रू. किमंतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

अटक आरोपीत हे मोटारसायकल सराईत गुन्हेगार असुन यापुर्वी ठाणे आयुक्तलयात आरोपीत कुणाल कृष्णा नायडु वय १९ वर्षे यास एकुण ०२ गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत खालीलप्रमाणे ०४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

पोलीस ठाणे मानपाडा पोलीस स्टेशन

कलम

भा दं. वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे

मानपाडा पोलीस स्टेशन

३६/२०२५

बी.एन.एस कलम ३०३ (२) प्रमाणे

कोळशेवाडी पोलीस स्टेशन

११७६/२०२४

बी.एन.एस कलम ३०३ (२) प्रमाणे

एनआरआय पोलीस स्टेशन, नवी मुंबई

१४८/२०२४

भा. दं. वि. कलम ३७९, ३४ प्रमाणे

१०/२०२४

सदरची कामगिरी मा. श्री. संजय जाधव, अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री. अतुल शेंडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण व मा. श्री. सुहास हेमाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग, वपोनि श्री. विजय कादबाने, मानपाडा पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि (गुन्हे) श्री. राम चोपडे, पोनि (का व सु) श्री जयपालसिंह गिरासे, पोनि (प्रशासन) श्री. दत्तात्रय गुंड, सपोनि संपत फडोळ, सपोनि महेश राळेभात, पोहवा सुनिल पवार, पौहवा. संजु मासाळ, पोहवा./विकास माळी, पोहवा./ शिरीष पाटील, पोहवा./राजेंद खिलारे, पोहवा/सचिन साळवी, पोना./गणेश भोईर, पोना/यलप्पा पाटील, पोना कृष्णा बोऱ्हाडे, पोशि./विजय आव्हाड, पोशि./अशोक आहेर, पोशि. सोपान शेळके, पोशि./नाना चव्हाण, पोशि, गणेश बडे, पोशि घनश्याम ठाकुर यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट