सांगली जिल्हा पोलीसांचे श्रीमती कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात उद्बोधनपर व्याख्यान..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सांगली :
दि. ०९/०१/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, सांगली येथे महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांच्या सुचनेनुसार मा. श्रीमती विमला एम. भापोसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग, सांगली, श्रीमती मेघा पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, महिला कक्ष, सांगली यांनी सायबर क्राईम, व्हाटस्अप, इंन्स्टाग्राम फेसबुक यांचे विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम, फायदे-तोटे, त्यावरील उपाययोजना याबाबत विद्यार्थ्यांना संवादपर मार्गदर्शन केले. तसेच एम. पी. एस. सी., यु. पी. एस. सी., सध्याच्या चालु घडामोडी, मोबाईलचा वापर, हैकिंग, वाहतुक नियम्प्रेची माहिती याबाबतही सुचनापर मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

व्याख्यानास श्रीमती छाया सुतळे पोलीस उपनिरीक्षक, सांगली शहर, निर्भया पथक व स्टाफ, महिला कक्ष, सांगली स्टाफ तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बी. पी. लाडगांवकर, उप प्राचार्य एम. बी. मोहिरे व शिक्षक स्टाफ तसेच एकुण दोनशे ते अडीचशे विद्याथी उपस्थित होते.

व्याख्यानाचे आभार प्रदर्शन श्रीमती कस्तुरबाई वालचंद कॉलेज ऑफ आर्टस् अॅन्ड सायन्स, सांगली महाविद्यालयाचे पर्यवेक्षक श्री. बी. बी. पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट