रोहा तालुक्यात ११ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार विरोधात आदितीताई तटकरे यांनी घेतली गंभीर दखल..

0
Spread the love

प्रतिनिधी-महेश देवाळे

रोहा ;
रोहा तालुक्यात वरसे येथे अत्यंत निंदनीय अमानवी अत्याचार एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपी तेजस गणेश पडवळ वय २५ वर्षे लिंगपिसाट नराधमाने केला आहे.

अत्याचार झालेल्या या कुटुंबियांची आदितीताई तटकरे यानी भेट घेतली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांना या प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल तसेच कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या दुर्दैवी घटनेतील पीडित कुटुंबासोबत बोलुन त्यांना सर्व प्रकारची मदत व न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पूर्णपणे वचनबद्ध आहोत याची खात्री आदितीताई यानी दिली.

महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचाराला एक जबाबदार समाज म्हणून आपण कधीच सहन करू शकत नाही आणि नराधम आरोपी तेजस गणेश पडवळ याला कडक शिक्षा झाल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही असे आदितीताई तटकरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट