शिरगांव येथे सागर क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी ड्रोन प्रणालीचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

0
WhatsApp Image 2025-01-09 at 7.10.33 PM
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर,

दि.9 जानेवारी 2025
रोजी सीमाभागातील अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील 7 जिल्ह्यांतील 9 समुद्र किनाऱ्यांवरून एकाचवेळी ड्रोनद्वारे देखरेख विशेष प्रणालीचे आज मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मुंबई येथील मत्स्य आयुक्त कार्यालय येथे उद्घाटन झाले. याचवेळी पालघर जिल्ह्यातील शिरगाव या समुद्रकिनाऱ्यावरून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ड्रोन उडवण्यास प्रारंभ केला.
राज्यातील 7 जिल्ह्यांतील 9 समुद्र किनाऱ्यांवरून एकाचवेळी ड्रोनद्वारे देखरेख प्रणालीचे प्रात्यक्षिक यावेळी झाली. यासाठी मत्स्य आयुक्त कार्यालय येथे कंट्रोल रूम उभारण्यात आला आहे. मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी कंट्रोल रूममध्ये उपस्थित राहून या नवीन प्रणालीला ड्रोन उडवण्यास संबंधितांना आदेश दिले. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.


पालघर जिल्ह्यातील शिरगाव, ठाणे जिल्ह्यातील उत्तन, मुंबई उपनगर जिल्ह्यातील गोराई, मुंबई शहर जिल्ह्यामधील ससून गोदी, रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, श्रीवर्धन, रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा, साखरी नाटे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड या नऊ समुद्रकिनाऱ्यावरून 9 ड्रोन उडवले गेली.
यावेळी मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त दिनेश हंसराज पाटील, संबंधित विभागाचे अधिकारी/कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी मंत्री श्री. राणे दूरदृश्य प्रणालीद्वारे म्हणाले की, ड्रोन यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर राज्याच्या 720 किलोमिटर लांबीच्या सागरी किनाऱ्यावरून राज्याच्या 12 मैल सागरी हद्दीपर्यंत बेकायदा मासेमारी करणाऱ्या अवैध नौकांवर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. अशा अनाधिकृत नौकांची माहिती घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी ड्रोन वेब सोल्युशनस स्ट्रिमिंगचा पुरावा म्हणून वापर केला जाणार आहे. त्यामुळे अवैध मासेमारीला चाप बसणार आहे. ड्रोन यंत्रणेमुळे राज्यातील सागरीक्षेत्र हे कॅमेऱ्याच्या नियंत्रणात येणार आहे. त्यामुळे अवैध मासेमारीला आळा घालने शक्य होणार असल्याचेही मंत्री श्री राणे यांनी यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट