स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांची कारवाई कसबे डिग्रज येथील हॉटेल फोडून साहित्य चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद दोन गुन्हे उघड.

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली
पोलीस स्टेशनसांगली ग्रामीणगु.घ.ता वेळदिनांक २४.१२.२०२४ रोजी २३.३० ते दिनांक २५.१२.२०२४ रोजी ०७.३० वा. च्या दरम्यान हॉटेल वैभव मधुनअपराध क्र आणि कलम१) ४३९/२०२४ बीएनएस कलम ३०५. ३३१ (४), ३(५)२) ४३७/२०२४ बीएनएस कलम ३०५. ३३१(४). ३(५)गु.दा.ता वेळ२५.१२.२०२४ रोजी १६.०४ वाफिर्यादी नावशित्तल बाळासो महिद, वय ३३ वर्षे, पत्ता कसबे डिग्रज, ता. मिरजमाहिती कशी प्राप्त झालीपोह/दरिबा बंडगर पोह/अनिल कोळेकर पोकों/विक्रम खोतकारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदारमा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे,मा. अपर पोलीस अधीक्षक रितु खोखर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा.सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार,स्था.गु.अ. शाखा, सांगली कडील खरात, अमर नरळे, पोहेकों/महादेव नागणे, अनिल कोळेकर, दऱ्याप्पा बंडगर, सागर लवटे, नागेश सागर टिंगरे, संदिप गुरव, सतीश माने पोना/ संदीप नलवडे, पोका / विक्रम खोत, सुरज थोरातसांगली ग्रामीण पोलीस ठाणे कडील सायबर पोलीस ठाणे कडील पोशि सहा. पो. फौ/मेघराज रूपनर, पोना/अभिजीत पाटील, बंडू पवार कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकरअटक वेळ दिनांक दि.३०/१२/२०२४ रोजीआरोपीचे नांव पत्ता१. समशुद्दीन महंमद इलीयास खान वय. २७ वर्षे सध्या रा. मोमीन नगर पेठवडगांव मुळ रा. गरीब नवाज हॉटेल जवळ गल्ली नं १ इंदीरा नगर ३० फुटी रोड मंडळ मानखुर्द शिवाजी नगर, मुंबई२. महंमद इम्रान अकबर अली बय. २४ वर्षे रा. मोमीन नगर पेठवडगांव मूळ रा. मैना ता. इटावा जि. सिद्धार्थ नगर, राज्य उत्तरप्रदेश३. फर्याद आलम महंमद इलीयास खान वय. २३ वर्षे रा. पिपरा पठाण ता. इटावा जि. सिद्धार्थ नगर राज्य उत्तरप्रदेश३,०६,२००/- रू गुन्हयात वापरलेले वाहन मालवाहतुक टेम्पो व हॉटेल साहित्य व रोख रक्कमगुन्हयाची थोडक्यात हकीकत-मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुध्दचे गुन्हे करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करून, मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करुन घरफोडीचे गुन्हे करणारे संशयीत इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणेकरीता आदेशीत केले होते.त्या अनुशंगाने दि. ३०.१२.२०२४ रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोहेकों / दरिबा बंडगर, अनिल कोळेकर पोकें/ विक्रम खोत यांना त्यांचे बातमीदाराकडुन, एमआयडीसी कुपवाड परिसरामध्ये एक संशयित काळे रंगाचा लहान टेंम्पो मुंबई पासिंग नंबर असलेला संशयित रित्या फिरत असुन त्याचे पाठीमागील हौद्यामध्ये भांडी व पत्रा घेऊन विक्री करणेकरीता ग्राहकाच्या शोधात आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.नमुद पथकाने मिळाले बातमीप्रमाणे, सदरचे वाहन सावळी आरटीओ ऑफीस समोरील रोडवरती असल्याची माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी आरटीओ ऑफीस सावळी जवळ पथकासह जावून बातमीप्रमाणे टॅम्पो असल्याची खात्री झाल्याने गाडीचे हौद्यामध्ये पोलीसांनी पाहिले असता मोठ्या गोण्या कशानेतरी भरलेल्या, भांडी व पत्र्याचे तुकडे असल्याचे दिसुन आले. तेव्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी टेम्पो ड्रायव्हर समुद्दिीन महंमद इलीयास खानची झडती घेता त्याचे शर्टाचे वरील खिशामध्ये रोख रक्कम मिळून आली ड्रायव्हर केबीनमध्ये फर्याद आलम याच्या समोरील बाजुस खाली असलेली सॅक उघडून पाहिली असता त्यामध्ये कटावणी, पक्कड, मारतुल, हेक्सा ब्लेड मिळुन आले. गाडीचे हौद्याची झडती घेतली असता त्यामध्ये पांढऱ्या य बारदानाच्या गोण्या, भांडी व पत्र्याचे तुकडे दिसुन आले. त्या साहित्याबाबत सपोनि पंकज पवार यांनी समुशुद्दीन खान याचेकडे विचारपूस केली असता त्यानी पेठवडगांव जि. कोल्हापुर येथे भाडयाने राहण्यास असुन रात्रीच्या वेळी आष्टा-सांगली रोडने कसबे डिग्रज परिसरात पाच-सहा दिवसापुर्वी हॉटेल वैभव व दहा दिवसापूर्वी हॉटेल शिलेदार सांगली मध्ये हॉटेलचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून तेथील मांडी व इलेक्ट्रीक फ्रिज, एसी वगैरे साहीत्य चोरून आणलेले होते तेच चोरून आणलेले साहीत्य या गाडीच्या हौद्यामध्ये लहान भांडी गोण्यामध्ये व मोठी पातेली, ग्राईडंर व हॉट केस गाडीमध्ये ठेवले असल्याचे सांगून कसबे डिग्रज गावातील हॉटेल वैभव व हॉटेल शिलेदार येथे चोरी केली असल्याची कबूली असून त्यांचे ताब्यातून ३.०६.२०० रू. मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर बाबत सांगली ग्रामीण पोलीस कडील अभिलेखाची पडताळणी केली असता वरील प्रमाणे गुन्हे सांगली ग्रामीण दाखल असून वरील आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी सांगली ग्रामीण पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असुन पुढील तपास सांगली ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत.