आज अंधेरी दैवज्ञ समाजाच्या २०२५ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन…

संपादिका – दिप्ती भोगल
अंधेरी ;




अंधेरी पूर्व विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री. मुरजी पटेल (काका ) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अशोक माहुलकर, सरचिटणीस अनिल कारेकर, सह सेक्रेटरी सुनिल वाडकर, उप खजिनदार राजेंद्र कारेकर, महिला सेक्रेटरी आरती मसुरकर, महिला खजिनदार समिधा धारगळकर, कार्यकारणी सदस्य मनोहर दांडेकर, सभासद सुनिल धारगळकर उपस्थित होते.
अंधेरी दैवज्ञ समाजाचे संरक्षक आणि अखिल भारतीय दै. स. परिषदेचे अध्यक्ष समाजश्रेष्ठी डॉ. गजानन रत्नपारखी यांनी श्री. मुरजी पटेल यांना अभिनंदन आणि शुभेच्छा संदेश पाठवला.
यावेळी अंधेरी दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष श्री. अशोक माहुलकर यांनी मा. आमदार श्री. मुरजी पटेल यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
कविवर्य अशोक माहुलकर यांनी श्री. मुरजी पटेल (काका) यांच्यावर स्वतः लिहिलेली कविता सादर केली आणि उपस्थितांची मने जिंकली..