वि सी गुर्जर विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज कशेळी येथे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न

0
Spread the love

प्रतिनिधी- सुशील तांबे

राजापूर:

वि.सी.गुर्जर विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज कशेळी यांचे २०२४-२०२५ या वर्षी तील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम दिनांक ०३/०१/२०२५ रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला त्यावेळी संस्थेचे चेअरमन श्री वसंतजी पाटील, उपाध्यक्ष श्री प.रा.कशाळकर ,श्री प़भाकर शिरवडकरजी मुख्याध्यापक श्री लाड सर तसेच कशेळी च्या सरपंच सौ.दिप्ती दिपक हळदणकर मॅडम, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग उपस्थित होते त्यावेळी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षिस वितरण करण्यात आले.
विशेष म्हणजे कशेळी गावाचे नाव रोशन करणारी विद्यार्थिनी व कशेळी गावची कन्या कुमारी सृष्टी सुहास कशाळकर हीने CA (चार्टर्ड अकाउंटेंट) ची परीक्षा उत्तीर्ण करून. गावाचे नाव लौकिक केले त्याबद्दल तिचे सर्वत्र गुणगान व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत तसेच कशेळी गावाच्या सरपंच सौ.दिप्ती दिपक हळदणकर मॅडम यांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला व सर्व शिक्षक वर्ग,पालक यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट