लोकल गाडीची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या महिलेचा पालघर रेल्वे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी हाताने उचलून तत्काळ वैद्यकीय मदत मिळून वाचवले जीव…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर
दि.31/12/24 रोजी गोपनीय शाखेचे पो. शि/832 शाम भोईर, पोशि/454 निंबाळकर असे पोलीस ठाणे पालघर ते डहाणू गस्तकामी असताना 18.10 मी.चर्चगेटच्या दिशेने जाणारी लोकल बोईसर स्टेशन वरून सुटल्यानंतर अचानक एक महिला ट्रॅक क्रॉस करत असताना तीला लोकलची धडक लागून गंभीर जखमी झाली. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून पो शि/832 शाम भोईर व पो शि. 454/निंबाळकर व बोईसर स्टेशन येथे कर्तव्यवर असणारे पो.शी.1904/तरडे यांचेसह जखमी महिलेला हाताने उचलून तात्काळ वैद्यकीय मदतीकरता हॉस्पिटला पोहोचवले. तसेच नमूद महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांना सदर घटनेबाबत माहिती दिली. सदर मदतीबाबत महिलेच्या नातेवाईकांनी रेल्वे पोलिसांची आभार मानले.