नंदुरबार पोलीसांची अनाथ मुलांसोबत आगळी वेगळी दिवाळी… !

प्रतिनिधी-रणजित मस्के
नंदुरबार: कोरोनामुळे २ वर्षांनंतर संपूर्ण देश मोठ्या उत्साहात दिवाळी साजरा करीत असताना नंदुरबार पोलीसांनी दिवाळीत अनाथांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे. पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून अनाथ मुले व गरीब परित्यक्ता महिला यांचेसोबत मिठाईसह या अनाथ मुलांना कपडे व परित्यक्ता महिलांना साड्या देऊन त्यांचेसोबत दिवाळी साजरी करुन नंदुरबार पोलीसांनी दिवाळीचा आनंद द्विगुणित केला आहे. तळागाळातल्या घटकांसोबत आपला आनंद वाटल्यांने तो दुप्पट झाल्याचे समाधान या पोलीसांच्या एरव्ही कडक वाटणाऱ्या चेहऱ्यावर दिसत होता तर दुसरीकडे पोलीसांची ही वेगळी प्रतिमा या अनाथ मुलांच्या व परित्यक्ता महिलांच्या चेहऱ्यावरील आनंदात ठळकपणे दिसत होती.




या अनाथ मुलांनीही रिटर्न गिफ्ट म्हणून पोलीसांना स्वतःच्या हाताने बनवलेली भेटकार्डे भेट दिली.कागदाच्या पुठ्यांवर स्वःताच्या हाताने बनवलेली ही भेटकार्डे या दिवाळीची सर्वात अनमोल भेट असल्याचे व रिटर्न गिफ्ट देण्याची या मुलांची भावना त्याहून अनमोल असल्याचे नंदूरबारचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक कार्यालयात ही भेटकार्डे लावण्यात येणार आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com