हवेत गोळीबार करुन दहशत माजवणारया फरारी आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा सातारा यानी ठोकल्या बेड्या…

प्रतिनिधी-रणजित मस्के
सातारा: दिनांक ११/१०/२०२२ (स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडक कारवाई दुर्गादेवी जसपाल रासदांडीया मध्ये हवेत गोळीबार करुन दहशत माजवणारे पोलीस अभिलेखावरील आरोपीना अटक करून त्यांचेकडून दोन देशी बनावटीची पिस्टल मशीनसह दोन जिवंत काडतसे जप्त.

५ ऑक्टोबर २०१२ रोजी रात्री १२.३० वा. चे सुमारास मंगळवार पेट सातारा , मनामती चौक येथे असणारे सेंट पॉल हायस्कुल येथे झालेल्या बाचाबाचीवरुन चिडून जावुन पोलीस अभिलेखावरील आरोपी अमिर गलिम शेख रा.हनुमान मंदिरा शेजारी बनवासवाडी, कृष्णानगर सातारा, अभिषेक उर्फ अबू राजू भिसे, रा.काळे वस्ती, निकीचंटस हॉटेलच्या पाठीमागे, मोळाचा ओढा सातारा, साहिल विजय मात, रा. शाहपूरी पोलीस ठाण्याचे समोर, आकाशवाणी झोपडपट्टी सातारा यांनी दोन मोटर सायकलवरुन येऊन अमीर शेख याने फिर्यादी यांना तु मला सुट्टी देत नाही, तुला आज जिवंत ठेवत नाही असे म्हनुन त्याचे जवळ असणारे पिस्तुलातुन फिर्यादी यांचे दिशेने गोळी झाडली. फिर्यादी खाली वाकल्याने गोळीचा नेम चुकला तसेच साक्षीदार सचिन श्रीपाद पडशी हे अमीर शेख यास असे करु नको असे सांगत असताना अमीर शेख याने सचिन श्रीपाद पडशी यांचे डोक्याला पिस्तुल लावुन शुट करतो असे बोलला त्यावेळी अभिजीत भिसे, साहील साचत यांनी त्याला ओरडून ठोक असे म्हणाले व त्यांचे सोबत असणारा यश साळुखे हा हातात लांब कोयता घेऊन फिर्यादी यांना मारण्यासाठी धावून आला म्हनुन वगैरे दिले फिर्यादीवरुन शाहुपूरी पोलीस ठाणे गु.र.नं.३२२/२०२२ भादविकलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९ सह मा.ह.अ.क, ३, ४, २५, २७, म.पो.अ.क.३७(१),१३५ अन्वये नोंद करण्यात आला होता.
नमुद गुन्हयातील पोलीस अभिलेखावरील आरोपी अभिषेक उर्फ अचू राजू भिसे, रा.काळे वस्ती, हंटिलच्या पाठीमागे, मोळाचा ओढा सातारा, अमिर सलिम शेखा रा.हनुमान मंदिरा शेजारी बनवासबाही, कृष्णानगर सातारा, साहिल विजय सावंत, रा.शाहुपूरी पोलीस ठाण्याचे समोर, आकाशवाणी झोपडपट्टी सातारा हे गुन्हा घडलेपासून फरारी होते. नमुद गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन फरारी आरोपींना ताब्यात घेण्याबाबत श्री,अजय कुमार बंसल, पोलीस अधीक्षक सातारा ग श्री.अजित घोहाडे, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी श्री.अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सुचना दिल्या, त्याप्रमाणे त्यांनी श्री,रमेश गर्जे, सहायक पोलीस निरीक्षक, व अमित पाटील, पोलीस उप-निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या अधिपत्याखाली एक विशेष पथक तयार केले.
दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ रोजी श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,सातारा यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शाहपुरी पोलीस ठाणे ग.र.नं. १२२/२०२२ भादविक ३०७, १४३, १४७, १४८, १४९ सह भा.ह. अ.क. ३, ४, २५, २७, म.पो.अ.क.३७(१),१३५ मधील आरोपी हे संग्राम विजय जाधव, रा, आदर्श विहार अपार्टमेंट गनवासघाडी सातारा यांचे घरी लपुन बसले आहेत, त्याप्रमाणे त्यांनी तपास पथकास नमूद आरोपींना ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या, तपास पथकाने प्राप्त इमले बातमीचे ठिकाणी जाऊन संग्राम विजय जाधव याचे घरातुन नमुद गुन्हयात फरारी असलेले आरोपी अभिषेक उर्फ अबू राजू भिसे, रा.काळे वस्ती, निकी बंटस हॉटेलच्या पाठीमागे, मोळाचा ओढा सातारा, अमि मलिम शेख रा.हनुमान मंदिरा शेजारी बनवासवाडी, कृष्णानगर सातारा, साहिल विजय सार्यत, रा.शाहपूरी पोलीस ठाण्याचे समोर, आकाशवाणी झोपडपट्टी सातारा यांना ताब्यात घेवून त्यांना पुढील तपासकामी शाहपूरी पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयाचे तपासी अंमलदार श्री.संजय पतंगे पोलीस निरीक्षक यांनी नमुद आरोपींचेकडे तपास करुन त्यांचेकडून २ देशी बनावटीची पिस्टल, तीन मॅग्डीन व २ जिवंत काडतुगे जप्त करण्यात आली आहेत.
श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे सुचनाप्रमाणे व श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गजे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, पोलीस अंमलदार संतोष सपकाळ, शरद बेचले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, गणेश कापरे, निलेश काटकर, मोहन पधार, विक्रम पिसाळ, पृथ्वीराज जापप, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, वैभव सावंत, यशोमती काकडे, ज्योती शिंदे यांनी सदरची कारवाई केलेली असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अमलदार यांचे श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा व श्री.अजित बोहाडे अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com