शिराळा बसस्थानकाचे वेळापत्रक कोलमडल्याने प्रहारचे बंटी नांगरे पाटील यांचे विद्यार्थ्यांसाठी आंदोलन..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :–
दी. 27/12/2024 रोजी
शिराळा बसस्थानकातून सुटणाऱ्या बसेसचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडले आहे. बसेस वेळेवर सुटत नसल्याने प्रवाशांची पुरती तारांबळ उडत आहे. याचा सर्वात जास्त फटका शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. शेकडो विद्यार्थी इस्लामपूर, आष्टा, कराड, पेठ नाका येथे विविध शिक्षणासाठी जातात. पास असूनही महाविद्यालयात वेळेत पोहोचता येत नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
रोजचं मरण सुरू आहे आज तर वाकुर्डे ५.३० ची गाडी ७.०० वाजता सुटली आम्ही वेळोवेळी शिराळा आगाराकडे वेळापत्रकात सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. विद्यार्थ्यांना नाहक मनःस्ताप होत आहे. अधिकाऱ्यांनी यामध्ये सुधारणा करावी, शिराळा विभाग कार्यालयाने यामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करावा.या वेळी उपस्तीत विद्यार्थ्या प्रतिक नाईकवाडी,शुभम चव्हाण,मनीष माने.
विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्रहार स्टाईल आंदोलन करू.
टिप : आजचा प्रश्न मिटला आहे रोज चालणार नाही
- श्रीराम (बंटी) नांगरे-पाटील
- 8623863686
तालुकाध्यक्ष, प्रहार व प्रवासी संघटना, शिराळा तालुका
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः - मोबा.नं. 9920601001
- info@surakshapolicetimes.com
- diptibhogal@surakshapolicetimes.com