रायगडचे नुतन पोलीस अधीक्षक म्हणून मुंबई झोन-१२ येथील सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती…

प्रतिनिधी-दिप्ती भोगल
अलिबाग: रायगड जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या रायगड पोलीस अधीक्षक या पदावर मुंबईतील परिमंडळ-12 दहिसर मध्ये कार्यरत असणारे श्री. सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शनिवार दिनांक 22 ऑक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी रायगड जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला आहे. रायगडचे मावळते पोलीस अधीक्षक श्री. अशोक दुधे यांनी त्यांचे स्वागत केले.

सोमनाथ घार्गे हे यापूर्वी बृहन्मुंबई येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 दहिसर येथील पदावर कार्यरत होते.
सध्या रायगड जिल्ह्यात वाढणारी गुन्हेगारी रोखण्याचे तसेच जिल्ह्यात गुन्हेगारी घटनामध्ये गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ होत आहे. खून, महिलांवरील अत्याचार आणि चोऱ्या, घरफोडय़ांचे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.तसेच आर्थिक फसवणुकीच्या घटना जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या आहेत. त्याचबरोबर सायबर गुन्ह्यांची व्याप्ती वाढत चालली आहे यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढल्यामुळे त्यांच्या समोर गुन्हेगारी रोखने एक आव्हानच आहे.
तसेच जिल्ह्य़ातील अवैध दारूविक्री, मटका, जुगार यांसारख्या समस्या प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नवनियुक्त पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांना पावले उचलावी लागणार आहेत. एकंदरीत या सर्व अवैध धंदेवाईकांविरोधात त्याना एक आव्हानात्मक मोहीम आखावी लागणार ही निश्चितच आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com