नवी मुंबई येथे दरोडा टाकुन सातपाटी पोलीस ठाणे हददीत लपुन बसलेल्या ६ अनोळखी आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर:-

कामोठे पोलीस ठाणे नवी मुबई गुन्हा नोंद क्रमांक ३१८/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३१० (२), ११५ (२), ११८(१), १३७, ३५१ (२), ३५२ अन्वये दाखल गुन्ह्यातील ०५ ते ०६ अनोळखी आरोपी यांनी गुन्ह्यातील फिर्यादी आणि जखमी यांचे अपहरण करून तसेच त्यांना रॉडने मारहाण करून त्यांचेकडून एकूण ९६,०००/- रुपये जबरीने चोरी करून दरोडा घातल्याची माहिती संबंधीत गुन्ह्याचे तपासी अधिकारी सपोनि श्री प्रशांत तायडे नेम. कामोठे पोलीस ठाणे यांनी दिनांक २२/१२/२०२४ रोजी सायकाळी १९.३० वाजताच्या सुमारास सपोनि योगेश जाधव प्रभारी अधिकारी सातपाटी पोलीस ठाणे यांना फोनव्दारे दिली तसेच सदर आरोपी हे तेथून फरार होवून आपले अस्तित्व लपविण्याच्या उद्देशाने सातपाटी पोलीस ठाणे अंतर्गत मौजे नांदगाव परिसरात असल्याचे कळविले होते. कामोठे पोलीस ठाणेचे पोलीस पथक देखील आरोपीच्या शोधाकरीता येत होते. तत्पूर्वी नमूद आरोपी हे तेथून पळून जावू नये याकरीता आरोपीना पकडून ताब्यात घेण्याची विनंती करून पोलीस मदतीची मागणी त्यांनी केली होती. सदरची माहिती सपोनि योगेश जाधव यांनी तात्काळ श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर व श्री. अभिजीत धाराशिवकर उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर यांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाखाली सातपाटी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सपोनि श्री योगेश जाधव, पोलीस हवालदार, बी. आर. सानप, पोलीस हवालदार, एम. एम. रगडे, पोलीस अमंलदार, जी. एस. व्हसकोटी, पोलीस अमंलदार, व्ही. साळी व पोलीस मित्र असे सर्व खाजगी वाहनाने नांदगाव सी व्हिव्ह रेसॉर्ट या ठिकाणी रवाना झाले.

नमूद आरोपींना त्याबाबतची चाहुल लागल्याने ते सदर ठिकाणाहून पळून जाण्याची पूर्व तयारीत असताना त्यांना अशा परस्थितीत सुस्थितीत ताब्यात घेवून पकडणे हे खुप आव्हानात्मक होते. या प्रसंगी सातपाटी पोलीसांनी प्रसंगावधान दाखवित ब-याच मेहनतीने रात्री उशिरा पर्यंत नमूद आरोपींचा सदर ठिकाणी कसोशिने शोध घेवून ०६ आरोपींना त्याच्या स्कॉर्पीयो वाहनासह पकडण्यात यश आले आहे. सकृत दर्शनी त्याचेकडे चौकशी करता त्यांनी गुन्ह्याची कबूली देत त्यांची नावे १) रामभाऊ विठठ्ल वेताळ, वय ४२ वर्षे, राहणार खारदांडा मुबई २) सबोद सदाशिव धोत्रे, वय ४० वर्षे, राहणार कोळीवाडा मुंबई ३) प्रशांत प्रकाश जगताप, वय ३५ वर्षे, राहणार घाटकोपर मुंबई ४) निलेश मनोहर माळी, वय ३९ वर्षे, राहणार आगरीपाडा खार मुंबई ५) योगेश क्रिष्णदेव तिवारी, वय ४० वर्षे, राहणार नालासोपारा, ता. वसई जि. पालघर ६) विनय अमित सकपाळ, वय २९ वर्षे, राहणार दिवा ठाणे अशी असल्याचे सांगितलेले आहे. सदर आरोपींना संबधीत गुन्ह्याचे तपास अधिकारी श्री प्रशांत तायडे व पोलीस पथक नेम. कामोठे पोलीस ठाणे नवी मुबई यांच्या ताब्यात देवून, पुढील विधीवत कारवाईस्तव कामोठे पोलीस ठाणे नवी मुबई येथे रवाना केले आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक, श्री बाळासाहेब पाटील, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री विनायक नराळे व मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, श्री अभिजीत धाराशिवकर, यांच्या मागदर्शनाखाली सातपाटी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री योगेश जाधव, पोलीस हवालदार, बी. आर. सानप, पोलीस हवालदार, एम. एम. रगडे, पोलीस अमंलदार, जी. एस. व्हसकोटी, पोलीस अमंलदार, व्ही. पी. साळी व पोलीसमित्र यांनी उकृष्टरित्या केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट