दिवाळी निमित्त मा.महापौर श्री. महादेव देवळे व जितेंद्र सकपाळ यांच्या हस्ते टाटा कॅन्सर हॉस्पिटल मध्ये विविध वस्तूंचे किट वाटप….

प्रतिनिधी-रणजित मस्के
मुंबई: शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिव आरोग्य सेना, वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मुंबई चे मा.महापौर श्री.महादेव देवळे साहेब यांच्या हस्ते व जागतिक मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जितेंद्र दगडू(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक २२/१०/२०२२ रोजी टाटा कॅन्सर हॉस्पिटल परेल येथे संघटनेच्या वतीने दिवाळी सनानिमित्त कर्करुग्ण बालकांना खेळणी,फळ व त्यांना डेली युज किट(त्यामध्ये टूथ ब्रश,टूथपेस्ट,तेल,ह्यांड टॉवेल व इतर) वस्तूंचे वाटप करण्यात आले नंतर स्थानीय लोकाधिकार समिती च्या ऑफिस मध्ये संघटनेच्या वतीने मा.महापौर श्री.देवळे साहेब यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .









तसेच सदर कार्यक्रमाचे पाहुणे मायेची सावली ग्रुप चे संस्थापक श्री.यशवंत खोपकर यांचा त्यांच्या वाढदिवसनिमित्त मा.महापौर श्री.देवळे साहेब यांच्या हस्ते शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी शिव आरोग्य सेनेचे कार्यकर्ते व AIACPC चे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री.अमित देशमुख, महा.महिला सचिव सौ.ज्योतीताई भोसले,ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री.अमित सुळे,WHRAF च्या मुंबई सरचिटणीस सौ.प्रमिला अडसूळ,मुंबई सचिव सौ.ऋतिका पंदूगडे,स्थानीय लोकाधिकार समिती चे श्री.नितीन गवळी,श्री.जगदीश सोलंकी,श्री.देवा कुलाट, श्री.नितीन नाईक,श्री.गणेश कांबळे,श्री.ललित फोंडेकर, AIACPC चे मुंबई सचिव श्री.हितेश गायकवाड, श्री.लीतेश केरकर, घाट.सचिव श्री.प्रकाश आंब्रे,मायेची सावली ग्रुप चे श्री.राजू पेडणेकर,श्री.सचिन राऊत,श्री.सुहास परब, श्री.विशाल नार्वेकर,श्री.अक्षय शिंगरे,अंजली भोसले,व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com