संस्कृती कलादर्पण संस्था सातपाटीच्या वतीने सातपाटी गावातील विद्यार्थ्यांना पेपरवर बोलू काही या शैक्षणिक विषयावर मार्गदर्शन देण्यात आले…!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर:-

दि .१३ डिसेंबर २०२४* रोजी संस्कृती कलादर्पण संस्था सातपाटीच्या वतीने शासकीय मत्स्य . माध्यमिक शाळा सातपाटी येथे सातपाटी गावातील माध्यमिक शाळा शासकीय मत्स्य . माध्य . शाळा सातपाटी आणि रायजिंग स्टार इंग्लिश हायस्कुल सातपाटी च्या इ .१०वी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित पेपरवर बोलू काही … या शैक्षणिक मार्गदर्शन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते . दोन्ही शाळांतील एकूण ५६ विद्यार्थ्यांनी या सत्राचा लाभ घेतला . या शैक्षणिक मार्गदर्शन सत्रासाठी किरण धारणे सर (अणू विकास दांडी विद्या . ) आणि समिधा पाटील मॅडम ( निजप हाय . शिरगांव ) हे मार्गदर्शक लाभले होते . दोन्ही मार्गदर्शकांनी त्यांच्या अनुभवसंपन्न ज्ञानाने विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले .पेपर लिहिताना कोणती खबरदारी घ्यावी ?अभ्यास कसा करावा ?विषयाचा पेपर पॅटर्न समजून घेणे आणि आपल्यातील सकारात्मक ऊर्जेला जागृत करुन यश संपादन कसे करावे ?अशा विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले .विदयार्थ्यांनीही त्यांचे प्रश्न विचारून चर्चा केली .
या शैक्षणिक मार्गदर्शन सत्रामुळे इ .१०वी च्या विदयार्थ्याना प्रेरणा मिळून आत्मविश्वास नक्कीच दुणावला आहे .
संस्कृती कलादर्पण संस्था सातपाटी च्या वतीने वर्षभर गावातील विद्यार्थी , कलाकारांसाठी शैक्षणिक , सांस्कृतिक कार्यक्रमांचे आणि विविध उत्सवांचे आयोजन करून संस्कृती संवर्धनाचे कार्य केले जाते . त्यामुळे संस्थेने गावाची सांस्कृतिक , सामाजिक परंपरा जपण्याचा वारसा सुरु ठेवला आहे

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट