बिर्ला कंपनीच्या सीईआर निधीतून आ. भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते ८ ग्रामपंचायतींना घंटा गाडीचे वाटप….

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड
महाड :- महाड औद्योगिक क्षेत्रात नव्याने उभ्या राहात असलेल्या बिर्ला कंपनीच्या सीईआर निधीतून कंपनी परिसरातील ८ ग्रामपंचायतींना घंटागाडीचे वाटप महाड पोलादपूर माणगांवचे आमदार भरतशेठ गोगावले यांचे हस्ते प्रांताधिकारी डॉ. बाणापुरे व बिर्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना आ. भरतशेठ गोगावले यांनी महाड औद्योगिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि नव्याने उभ्या राहात असलेल्या कंपन्यांनी केवळ या क्षेत्रात उत्पन्न न कमावता आपल्या उत्पन्नातील काही वाटा सामाजिक कार्यावरही खर्च करावा त्यासाठी कंपनीच्या सीईआर व सीएसआर मधील निधीतून परिसरातील ग्रामपंचायतीतील आरोग्य, स्वच्छता सुधारण्यासाठी व प्रदुषण कमी व्हावे यासाठी उपाययोजना कराव्यात असे आवाहन करीत बिर्ला कंपनीने आपल्या सीईआर व सीएसआरचा निधी खर्च करताना लोकप्रतिनिधीचा सल्ला घ्यावा अशी सुचना केली.
या प्रसंगी प्रांताधिकारी डॉ. बाणापुरे यांनी बिर्ला कंपनी उभारण्याचे काम सुरु असून या कंपनीचे उत्पादन सुरु होण्यापुर्वी त्यांच्या सीईआर निधी परिसरातील गावांच्या आरोग्य व स्वच्छतेवर खर्च करणे शासन नियमा नुसार बंधनकारक आहे. त्यानुसार प्रशासनाकडून १३ ते १४ ग्राम पंचायतीसाठी घंटागाडी देण्याचा प्रस्ताव कंपनी व्यवस्थापनाकडे केला होता.त्यानुसार आज बिरवाडी, नडगांव तर्फे बिरवाडी, मोहोत, कांबळे त. महाड, पिंपळवाडी, कुसगांव, साकडी या ग्रामपंचायतींना आ. गोगावले यांच्या हस्ते चावी देऊन इलेक्ट्रीक घंटा गाडीचे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.या प्रसंगी बिर्ला कंपनीचे प्रमुख महेंद्र शेखावत, अरुण शिर्के, चीफ सिक्युरीटी ऑफिसर मेजर संदिप दुबे, बीडीओ स्मिता पाटील, महाड तहसिलदार महेश शितोळे,पोलादपूर तहसिलदार कपिल घोरपडे, शिवसेना तालुका प्रमुख बंधु तरडे,सरपंच सुनिल देशमुख आदी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com