अग्निशस्त्राच्या गुन्हयांतील पाहिजे आरोपी यांस अटक करुन त्याचेकडुन चोरीची बुलेट व अॅक्टिव्हा जप्त करुन दोन वाहन चोरीचे गुन्हे उघड..

0
Spread the love

पुणे :

उपसंपादक- उमेद सुतार

दि.०९/१२/२०२४ रोजी गुन्हे शाखा युनिट ३ मधील अधिकारी व स्टाफ असे सिंहगड रोड पोलीस ठाणे हददीत पाहिजे फरारी व तडीपार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार गणेश सुतार व ज्ञानेश्वर चित्ते यांना बातमी मिळाली की, धायरी पुणे येथील श्री कंट्रोल चौक ते अभिनव कॉलेज रोडवर एक इसम बुलेट गाडी घेवुन थांबलेला असुन त्याचेकडे असलेली बुलेट चोरीची आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने वरिष्ठांचे आदेशान्वये सदर मिळालेले बातमीच्या ठिकाणी युनीट ३ कडील सहा. पो. निरीक्षक ढवळे व अंमलदारासह जावुन इसम नामे अदित्य अतुल माने वय.२२ वर्षे. रा. माने निवास, प्रभात प्रेस जवळ अभिनव कॉलेज पाठीमागे धायरी पुणे यास बुलेट गाडी सह ताब्यात घेवुन त्याचेकडे अधिक चौकशी करता त्याचा मामेभाऊ साहिल सागर शेलार वय.१९ वर्षे रा. पानशेत रोड गो-हे खुर्द पुणे याने सात ते आठ महिन्यापुर्वी नसरापुर येथुन गाडी चोरलेली असल्याचे सांगितले. त्याबाबत राजगड पोलीस ठाणे येथे खात्री करता राजगड पोलीस ठाणे गु.र.नं ९२/२०२४ कलम ३७९ भादवि अन्वये गुन्हा नोंद असल्याचे आढळुन आलेले असुन सदर आरोपीस पुढील तपासकामी राजगड पोलीस ठाणे यांचे ताब्यात दिलेले आहे.

तसेच सिहंगड रोड पोलीस ठाणे गु.र.नं ७२३/२०२४ भारतीय शस्त्र अधि कलम ३(२५), महाराष्ट्र पोलीस अधि कलम ३७ (१) सह १३५ मधील पाहिजे आरोपी नामे साहिल सागर शेलार वय.१९वर्षे रा. पानशेत रोड गो-हे खुर्द पुणे यांस अटक करुन त्याचेकडुन सुमारे १५ दिवसापुर्वी राजगड पोलीस ठाणे गु.र.नं ५५९/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता मधील चोरीस गेलेली २५,०००/-रु. किंमतीची एक काळे ग्रे रंगाची अॅक्टीव्हा मोपेडनंबर एम.एच.१२.आर.डब्ल्यु. ७१९२ हि जप्त करुन सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे. तसेच आरोपीवर यापुर्वी सिंहगडरोड पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं.२४१/२०२४ भा.दं.वि.क.३७९ अन्वये गुन्हा नोंद आहे.

सदरची कारवाई ही शैलेश बलकवडे साो, अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, निखिल पिंगळे साो, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा पुणे शहर, गणेश इंगळे सो, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-१, पुणे शहर यांचे मार्गदर्शनखाली रंगराव पवार वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट ३ गुन्हे शाखा, पुणे शहर, सहा. पो. निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पो.हवा. शरद वाकसे,गणेश सुतार, सुजित पवार, संजीव कळंबे, महिला पोलीस हवा. सोनम नेवसे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर चित्ते, प्रतिक मोरे, राकेश टेकावडे, हरिश गायकवाड, इसाक पठाण व यांनी कामगिरी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट