महीला रेल्वे प्रवाशी सुरक्षा संदर्भात जनजागृती व खाकीतील सखी Coto app बाबत जनजागृती…!

उपसंपादक : मंगेश उईके
वसई :– दि. 04/12/2024 रोजी वसई रोड लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विरार रेल्वे स्टेशन वर महिलांच्या राखीव डब्या समोर महीला सुरक्षा अंतर्गत *”खाकीतील सखी” बाबत coto app व जनजागृती बाबत तसेच रेल्वे रुळ ओलांडुन जाऊ नये त्याऐवजी रेल्वेने प्रवाशांसाठी तयार केलेल्या ब्रिज, एक्सेलेटर, चा वापर करावा , रेल्वेच्या मालमत्तेस नुकसान पोहचवतांना जर कोणी आढळून आल्यास त्या बाबत त्वरित पोलिसांशी, किंवा रेल्वे स्टेशन मास्तर, रेल्वे सुरक्षा बल यांना तात्काळ माहिती द्यावी.याबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
सदर वेळी मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून खाकीतील सखी “भरोसा करके तो देखो” ह्या मोहीम अंतर्गत रेल्वे प्रवासा दरम्यान महीला सुरक्षतेबाबत सूचना दिल्या..


तसेच महिला प्रवाशांना प्रवासात सुरक्षेबाबत व प्रवासादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास रेल्वे पोलीस हेल्पलाईन नंबर 1512 व त्या पत्रकामध्ये दिलेल्या खाकीतील सखी यांचे मोबाईल क्रमांकावर संपर्क करणेबाबत आवाहन करण्यात आले.तसेंच coto app डाऊनलोड करण्यास सांगितले.
रेल्वेने प्रवास दरम्यान दरवाज्यात उभे राहून फोनवर बोलू नये.
महिलांच्या सुक्षिततेसाठी रात्री 8.00 ते सकाळी 7.00 वाजेपर्यंत महिलांचे राखीव डब्यात रेल्वे पोलिसांची नेमणूक करण्यात येते. शक्यतो त्या डब्यातूनच प्रवास करावा.
सदर मोहिमेस महिला प्रवाशी तसेच रेल्वे प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला.
सदर जनजगृती अनघा सातवसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसई रोड रेल्वे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली संध्याकाळी 16:50 ते 17:15 वाजेपर्यंत विरार रेल्वे स्टेशन येथे करण्यात आली असून सदर जनजगृती करिता पोउपनि. खैरणार,03 महिला पोलीस अंमलदार, व स्टेशन ड्युटीवरील 02 पोलीस अंमलदार व 02 होमगार्ड असे हजर होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com