गोंदियात नियत वायोमनाने सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांचे निरोप समारंभ संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– दिनांक- 30/11/2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे- नोव्हेंबर 2024 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी-अंमलदार-
1) सहायक पोलीस उप- निरीक्षक – श्री. शंकर हरीचंद साठवणे ,
2) पोलीस हवालदार- श्री. गौरीशंकर दागोराव बिसेन,
3) पोलीस हवालदार- श्री. रामेश्वर तिलकचंद बर्वे
यांचे निरोप म्हणून त्यांचे सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते….. सदर सत्कार समारंभ निरोप कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे शुभ हस्ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले नमूद पोलीस अधिकारी-अंमलदार यांना शाल, श्रीफळ, झाडाची रोपटी, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, भेट वस्तु देवून त्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच त्यांना पुढील भावी आयुष्याच्या प्रवासात शूभेच्छा देण्यात आल्या..
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोदिया मा. श्री. गोरख भामरे, तसेच प्रभारी पोलीस उप- अधिक्षक (गृह), श्री. रामेश्वर पिपरेवार, तसेच पोलीस अधिकारी- अंमलदार यांचे कुटुंबीय कार्यालयातील पोलीस अधिकारी अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.







सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह), श्री. रामेश्वर पिपरेवार, यांनी केले. तर सदरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, श्री. रामेश्वर पिपरेवार, पोहवा राजु डोंगरे, राज वैद्य, मपोहवा ज्योती मरकाम, यांनी कार्यवाही पार पाडली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com