महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाच्या आयोजित 26/11 मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी जवान यांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम गेट ऑफ इंडिया येथे करण्यात आला..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

मुंबई:-
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी आयोजित गेट ऑफ इंडिया येथे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचा 26/11चा श्रद्धांजली चा कार्यक्रम संपन्न झाला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना श्रद्धांजली चा कार्यक्रम मागील आठ वर्षापासून श्रद्धांजलीचा कार्यक्रम पोलिसांचा सन्मान व्हावा महाराष्ट्रातील पोलिसांची ताकद वाढवावी म्हणून महाराष्ट्रात गेटवे ऑफ इंडिया आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात साजरा केला जातो या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलिसांची ताकद पोलीस परिवारांच्या अडचणी आणि लागणारी गरज या सर्व गोष्टी कार्यक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांच्याकडे मांडला जसे की डीजी लोन ग्रह अगरिम लोन तात्काळ मंजूर करून द्यावा, पोलिसांना हक्काचं घर पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोफत आरोग्य सुविधा पोलीस पाल्यांना रोजगार आणि पोलीस भरती मध्ये आरक्षण असंख्य मागण्या मांडन्यात आल्या आणि साहेबांनी त्या सोडवण्याचे लगेच आश्वासित पण केले या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकर साहेब, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे साहेब, आमदार अभिमन्यू पवार साहेब, आमदार नारायण कुचे साहेब, सिने सृष्टीतील नामांकित दिग्दर्शक आणि निर्माते जॅकी भगनानी, सृष्टीमधील अॅडव्हर्टायझिंग एजन्सी चे मालक विकी वादवाणी, बिग बॉस विजेत्या मेघा धाडे, मुंबई झोन वन डीसीपी मुंडे साहेब, आपला पोलीस बॉईज जो खूप प्रसिद्ध गायक सिद्धार्थ कोळी, सामाजिक कार्यकर्ते समित कदम तमाम महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे पदाधिकारी पोलीस परिवार पोलीस पत्नी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट