बोरीवलीत मनसे तर्फे पहिल्यांदाच गरीब व गरजू महिला / मुलींसाठी ब्युटी पार्लर व मेंहदी कोर्स…!

प्रतिनिधी-दिप्ती भोगल
बोरीवली: बोरीवलीत मनसे शाखा क्रमांक 1 1 चे शाखाध्यक्ष माननीय श्री. राजेंद्र (राजु) माने आणि महाराष्ट्र सैनिक सो.कविता राजेंद्र माने यांच्या सौजन्याने तसेच महिला जनाधार विकास शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्याने बोरीवलीत पहिल्यांदाच विभागातील गरजु व गरीब महिला व मुलींसाठी सरकारी प्रशस्तिपत्रकासहीत ब्युटी पार्लर व मेंहदी कोर्स अगदी माफक दरात दिवाळी नंतर शिकवण्यात येणार आहेत .

तरी विभागातील जास्तीत जास्त गरजु व गरीब महिला मुलीनी आपली नोंदणी बोरीवलीतील शाखा क्रमांक 11 च्या मनसे महिला सैनिक सो.सुषमा सुधीर शिंदे यांच्या मोबाईल क्रमांक 9082828947 यावर संपर्क करुन आपल्या नावाची नोंदणी करावी व या माफक दरात मिळणाऱ्या ब्युटी पार्लर व मेहंदी कोर्सचा लाभ घ्यावा व आम्हाला जनसेवा करण्यास सहकार्य करावे असे आव्हान मनसे शाखा क्रमांक 11 चे शाखाध्यक्ष श्री राजेंद्र माने व मनसेसैनिक यांच्या तर्फे करण्यात येत आहे.


या एक महिन्याच्या दर दिवशी दुपारनंतर आयोजित करण्यात आलेल्या कोर्स मध्ये ब्युटी पार्लरची सर्व बेसिक कला व मेंहदी डिझाईनची कला प्रत्यक्षात शिकवली जाणार आहे त्यांनंतर या कोर्स मध्ये भाग घेणाऱ्या अभ्यासिकांना सरकारी सर्टीफिकेटचे अनावरण देखील मनसे शाखे तर्फे करण्यात येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com