डोणजे परिसरातील शासकीय ठेकेदार बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांचा खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :-स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, व हवेली पो. स्टे. ची कारवाई
हवेली पोलीस स्टेशन गुर.नं. २६०/२०२४ भा.न्या.सं. १४०(२), ३५१, (२) ३५१(३), ३(५) प्रमाणे दि. १५/११/२०२४ रोजी गुन्हा दाखल असून सदर गुन्हयातील फिर्यादी नामे सोनाली विठ्ठल पोळेकर रा. शुक्रवार पेठ, काळा हौद, पुणे यांचे वडील नामे विठ्ठल सखाराम पोळेकर वय ७० वर्षे रा. पोळेकर वाडी, सिंहगड रोड, डोणजे ता हवेली जि पुणे हे बांधकाम व्यावसायिक असून शासकीय ठेकेदार आहेत. दि.१४/११/२०२४ रोजी विठ्ठल सखाराम पोळेकर हे नेहमीप्रमाणे सकाळी ०५/३० वा. सु॥ स त्यांचे राहते घरातून सिंहगड किल्ल्याचे दिशेने मॉर्निंग वॉक करीता गेले होते. ते पुन्हा घरी नेहमीचे वेळेत सकाळी ०७/३० वा. सुास आले नाही म्हणून हवेली पो स्टे येथे मानव मिसींग रजि नं. ६३/२०२४ दि १४/११/२०२४ रोजी मिसींग खबर नोंदविणेत आलेली होती. सदर मिसींग व्यक्ती विठ्ठल पोळेकर यांचा शोध पोलीस तसेच नातेवाईक घेत असताना मिसीग व्यक्ती नामे विठ्ठल पोळेकर यांनी पायगुडे वाडी ते गोळेवाडी रस्त्याचे शासकीय कामाचा ठेका घेतला होता. त्या कामात कोणताही अडथळा करू नये म्हणून योगेश ऊर्फ बाबु किसन भामे रा. डोणजे ता. हवेली जि पुणे याने विठ्ठल पोळेकर यांचे कडे खंडणी म्हणून एक जॅग्वार कंपनीची चारचाकी कार मागितली होती, त्याची पुर्तता न केल्यास विठ्ठल पोळेकर व त्यांचा मुलगा प्रशांत पोळेकर यांचा खुन करण्याची धमकी दिली होती. असे प्रशांत विठ्ठल पोळेकर यांचेकडून माहिती मिळाली व डोणजे गावातील योगेश ऊर्फ बाबु किसन भामे हा त्याचा मोबाईल बंद करून गावात नसल्याने त्यानेच विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण केल्याची त्यांची खात्री झ एल्याने १) योगेश ऊर्फ बाबु किसन भामे, २) रोहित किसन भामे रा. डोणजे ता. हवेली, जि. पुणे यांनीच त्यांचे साथीदारांचे मदतीने केले असल्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा नोंदविणेत आला आहे.
सदरचा गुन्हा हा निवडणुक आचारसंहिता कालावधीत घडला असल्याने त्याचे गांभीर्य लक्षात घेवून सदर गुन्हा
उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख साो पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सुचना
केल्या होत्या, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून गुन्हयाचा सर्मातर तपास सुरु करणेत आला. सीसीटीव्ही
फुटेज तपासणेत आले, अपहरण झालेले विठ्ठल पोळेकर यांचे राहते घराचे सीसीटीव्ही तपासणेत आले, विठ्ठल पोळेकर यांचे
घरासमोरून एक पांढरे रंगाची स्विफ्ट कार सिंहगड किल्ल्याचे दिशेने जाऊन काही मिनीटांमध्ये पुन्हा माघारी डोणजे बाजूकडे
गेली व पायगुडे वाडी मार्गे पानशेत बाजुकडे गेल्याची आढळून आले.

गोपनीय बातमीदारामार्फत सदर कारची माहिती मिळाली असता, पांढरे रंगाची स्विफ्ट कार नं. एम.एच. १२ एफ.के. ५०३२ ही डोणजे गावातील असून सदर कार ही डोणजे गावातील गणेश मुरलीधर चोरमले बांची असून व सध्या ती कार दोन दिवसापासून योगेश ऊर्फ बाबू भामे हा वापरत आहे अशी माहिती मिळाली. त्यामुळे योगेश भामे याचा त्याचे राहते घरी शोध घेतला तो मिळून आला नाही, त्याचा मोबाईल बंद होता, त्याचे कुटुंबिय यांना देखील तो कोठे गेला याबाबत माहिती नाही अशी माहिती मिळाल्याने सदरचा गुन्हा हा योगेश भामे यानेच केल्याची खात्री झाली.
कारचा सीसीटीव्ही द्वारे पाठपुरावा केला असता, सदर स्विफ्ट कार नाशिक बाजूकडे गेली असून कारमध्ये तीन इसम त्यामध्ये योगेश ऊर्फ बाबु भामे हा कार चालवित असल्याचे आढळले, त्याचे सोबत असलेल्या इतर दोन व्यक्तीची गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळवली असता, योगेश ऊर्फ बाबु भामे याचे सोबत शुभम पोपट सोनवणे व मिलींद देवीदास थोरात असे अहिल्यानगर जिल्हयातील दोघेजण असून ते पतंजली हॉटेल डोणजे येथे कामास होते अशी माहिती मिळाली. त्यांचा शोध घेवून संपर्क करणेचा प्रयत्न केला त्यांचे देखील मोबाईल फोन बंद होते.
स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः त्यांचे पथकासह नाशिक येथे जाउन गुन्हयातील आरोपींचा शोध घेतला असता, आरोपी हे रेल्वेने उत्तर भारताकडे गेल्याचे निष्पन्न झाले. आर.पी.एफ. नाशिक रोड पो ढाणेची मदत घेवून तीनही आरोपी हे गोरखपूर जाणारे रेल्वेने गेले असल्याचे समजले. त्यानंतर जी.आर.पी. पोलीस ठाणे जबलपूर मध्यप्रदेश यांचेशी संपर्क करणेत आला. स्था.गु.शा.चे एक पचक जबलपूर येथे रवाना करणेत आले, त्यानंतर जी.आर.पी. पोलीस ठाणे जबलपूर मध्यप्रदेश यांचे मदतीने तीन आरोपींचा शोध घेतला असता, आरोपी नामे १) शुभम पोपट सोनवणे वब २४ वर्षे, रा. चिंचोली गुरव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर, २) मिलींद देवीदास थोरात, वय २४ वर्षे, रा. बेलगाव ता. कर्जत जि. अहिल्यानगर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी सदरचा गुन्हा मुख्य आरोपी योगेश ऊर्फ बाबु भामे याचे सांगणेवरून त्यांनी संगणमताने केला असल्याचे सांगितले असून सदर तिघे आरोपींनी अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली असल्याचे सांगितले असल्याने सदर गुन्हयास बी.एन.ए. १०३, २३८ असे कलम वाढविणेत आले आहे.
तसेच सदर आरोपींनी गुन्हा करणेसाठी वापरलेली स्विफ्ट कार नं. एम.एच. १२ एफ.के.५०३२
ही हस्तगत करणेत आलेली आहे. यातील आरोपी नामे ३) रोहित किसन भामे वय २२ वर्षे रा. डोणजे ता. हवेली जि पुणे यास दि. १५/११/२०२४ रोजी अटक करणेत आलेली असून त्याची दि. २१/११/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे. यातील आरोपी योगेश ऊर्फ वायु किसन भामे याचेवर शरीराविरूद्धचे एकूण ०९ गुन्हे दाखल असून सदरचे गुन्हे हे आर्थिक लाभासाठी केलेले असून त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, फसवणूक, अतिक्रमण, बेकायदेशीर अग्निशस्व बाळगणे असे गुन्हे दाखल असून आरोपी शुभम सोनवणे याचेवर खुनाचा प्रयत्न व बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणे असे ०२ गुन्हे दाखल आहेत. आरोपी योगेश ऊर्फ बाबु किसन भामे याचा शोध चालू आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनीलकुमार पुजारी, हवेली विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, हवेली पो स्टे चे पोनि सचिन वांगडे, स्था.गु. शाचे सपोनि कुलदीप संकपाळ, दत्ताजीराव मोहिते, सपोनि अमोल बामणे, सपोनि सागर पवार, पोसई सुतनासे, अंमलदार हनुमंत पासलकर, महेश बनकर, रामदास बाबर, राजू मोमीण, अतुल डेरे, दिपक साबळे, मंगेश थिगळे, संदीप वारे, अक्षय नवले, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, तुषार भोईटे, मंगेश भगत, अमोल शेडगे, काशिनाथ राजापुरे, दगडू विरकर, संतोष भापकर, दिपक गायकवाड, संतोष तोडकर, गणेश धनवे, महेंद्र चौधरी, सचिन गुंड, यांनी केली असून नाशिक शहर गुन्हे शाखेचे पो नि जयराम पायगुडे, भुषण सोनवणे, मंगेश जगझाप, भगवान जाधव, रविंद्र दिघे तसेच आरपीएफ पो स्टे नाशिक रोड चे पो नि हरपुल सिंग, अंमलदार दिनेश यादव, सागर वर्मा, तसेच जी.आर.पी. रेल्वे पो ठाणे जबलपूरचे पो नि निरंजन गुजर, अंमलदार अमर धुर्वे, यांनी केली असून पुढील तपास हवेली पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने करणेत येत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com